minister shambhuraj desai reached examination center with daughter 
जिल्हा

गृह राज्यमंत्र्यांमधील पिता दहावीच्या परीक्षा केंद्रावर जातो तेव्हा...

सरकारनामा ब्युरो

सातारा :  गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आपल्या दहावीत असलेल्या कन्येला परीक्षा केंद्रावर नेऊन सोडले. खुद्द गृहराज्यमंत्री परीक्षा केंद्रावर आल्याचे पाहून सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला तर काहींनी समाधानही व्यक्त केले.

मंत्री म्हटले की त्यांच्या मागे दौरे, कार्यक्रम आणि मंत्रिपदाचे कामकाज अशा अनेक जबाबदाऱ्या आल्या. यातून कुटुंबासाठी वेळ उरतच नाही. अधिवेशन काळात तर मंत्री पूर्णवेळ मुंबईत व्यस्त असतात. 

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिवेशनास दोन दिवस सुट्टी कुटुंबासाठी विशेष वेळ काढला. त्यांची मुलगी ईश्वरी दहावीत असून तिची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. आज तिसरा पेपर असल्याने शंभूराज यांनी तिला स्वतः परीक्षा केंद्रावर सोडले. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी स्मितादेवी देसाई होत्या. कन्या ईश्वरी हिने परीक्षा केंद्रात जाताना आई वडिलांना नमस्कार केला.

खुद्द गृहराज्यमंत्री आपल्या कन्येला परीक्षा केंद्रावर सोडायला आल्याचे पाहून अनेकांना समाधान वाटले. यावेळी शंभूराज देसाई यांना त्यांच्या दहावीतील आठवणी ताज्या झाल्या. ते म्हणाले, अधिवेशनास दोन दिवस सुट्टी असल्याने मी कन्येला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आलो आहे. आमच्या लहानपणी सोयी सुविधा नव्हत्या. आमचे आई वडील आम्हाला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी येत नव्हते. आमचे आम्हीच मित्रांसोबत परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा दिली आणि पासही झालो. यानिमित्ताने आमच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या असून माझा दहावीच्या परीक्षेसाठी सुशीलादेवी हायस्कुल येथील केंद्रावर नंबर आला होता, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT