मुंबई - भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना तूर्तास हायकोर्टचा दिलासा मिळाला. मेहता यांच्या विरोधात महिलेने केलेल्या बलात्काराच्या तक्रारी बाबत राज्य शासनाला खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच पुढील सुनावणी होईपर्यंत मीरा भाईंदर पोलिसांनी मेहतां विरोधात कठोर कारवाई करु नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुढील सुनावणी नऊ मार्चला होणार आहे.
भाजपच्या मीरा-भाईंदरमधील नगरसेविकेने भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबियांना जीवाला धोका असल्याचे या नगरसेविकेचे म्हणणे आहे. मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचा आरोपही या नगरसेविकेने केला आहे.
याबाबत ही नगरसेविका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडेही गेली होती. पण त्यांच्याकडून न्याय न मिळल्याने तिने पोलिसांकडे धाव घेतली. मागील वीस वर्षांपासून मेहता आणि मानसिक छळ करीत असून आम्हाला एक मुलगाही आहे, असे महिलेचे म्हणणे आहे.
गेल्याचा आठवड्यात अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटले होते. माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात कारवाईची जोरदार मागणीही करण्यात आली. त्यानंतर नरेंद्र मेहता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अटकेची शक्यता असल्याने मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.