Onion Exported from London Found in Bhiwandi
Onion Exported from London Found in Bhiwandi 
जिल्हा

भिवंडीत आला इराणचा कांदा; पोलिसांकडून घटनेची नोंद

सरकारनामा ब्युरो

भिवंडी : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनसह अन्य देशांतून येणाऱ्या संशयास्पद वस्तूंच्या आयात-निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे; मात्र असे असतानाच इराण येथून भिवंडीत विक्रीसाठी आलेला कांदा एका बंद यंत्रमाग कारखान्यात साठवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खोणी ग्रामपंचायत हद्दीतील मीठपाडा येथे हा कांदा साठवण्यात आला आहे.

भिवंडीत विक्रीसाठी आलेल्या या कांद्याचा आकार मोठा असून, त्याला आता कोंबदेखील फुटले आहेत. सडक्‍या वासामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून चौकशी सुरू केली आहे.

भिवंडी तालुक्‍यातील वळ व पूर्णा ग्रामपंचायत परिसरात विदेशातून आणलेले जुने मास्क धुऊन पुन्हा विक्री करण्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी उघड झाला. असे असतानाच आता इराण येथून भिवंडीत विक्रीसाठी आलेला कांदा एका बंद यंत्रमाग कारखान्यात साठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार खोणी ग्रामपंचायत हद्दीतील मिठपाडा येथे उघडकीस आला.

मिठपाडा येथील बंद कारखान्यात मागील आठ दिवसांपासून हा कांदा साठवून ठेवण्यात आला आहे. त्यास दुर्गंधी सुटल्यानंतर परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास जाणवला. त्यामुळे आकाश साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता हा कांदा इराण येथून आला असल्याची माहिती त्यांना या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दिली.

हा कांदा परेश मेहता या व्यापाऱ्याचा असून, त्याने मिठपाडा येथील पवन शेठ या कारखाना मालकाच्या कारखान्यात सध्या हा कांदा साठवून ठेवला आहे. हा कांदा जवळपास 60 टन इतका आहे - रियाज अली, कारखाना व्यवस्थाक.

पोलिसांकडून पाहणी

निजामपुरा पोलिस ठाण्यात माहिती कळवताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक अमोल दाभाडे यांनी आपल्या पोलिस पथकासह काल रात्री घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करीत नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे. तसेच याबाबत पोलिसांनी पणन विभाग व कृषी अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT