Police Capturing Lock Down Breaker Through Drone Camera
Police Capturing Lock Down Breaker Through Drone Camera 
जिल्हा

'ड्रोन' ने चित्रीकरण करुन मोकाट फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : "राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारपासून ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रिकरण करण्यात येणार आहे. या चित्रिकरणात जे येतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत," अशी माहिती राजगडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे यांनी दिली. 

सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाउन करण्यात आले आहे. मात्र तरीही अनेक नागरीक विणाकारण घराबाहेर पडून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. या पार्श्वभूमीवर राजगड पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने चित्रिकरण करून गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

याबाबत राजगडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे म्हणाले, "राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारपासून आम्ही ड्रोनच्या सहाय्याने चित्रिकरण करणार आहोत. या चित्रिकरणामध्ये जे येतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT