rajan teli criticize udhhav thakcrey
rajan teli criticize udhhav thakcrey 
जिल्हा

उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गवर अन्याय केला: राजन तेली

सरकारनामा ब्युरो

सावंतवाडी (सिंधुदुर्ग): फडणवीस सरकारने बजेट प्रयोजन करून मंजुरी दिलेल्या कामांना ठाकरे सरकारने स्थगिती देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यावर एक प्रकारे अन्याय केला आहे. त्या अनुषंगाने उद्या (ता.25) जिल्ह्यातील आठही तालुक्‍यात तहसील कार्यालयासमोर भाजपा धरणे आंदोलन छेडणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी दिली. 

येथील शासकीय विश्रामगृहावर श्री. तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस मधुसूदन बांदिवडेकर, अशोक सावंत, जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, सहकार सेलचे कमलाकांत कुबल, मंडल तालुकाध्यक्ष सिद्धार्थ भांबुरे, महेश धुरी, संदीप गावडे, पंचायत समिती सदस्य रविंद्र मडगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, दादू कविटकर आदी उपस्थित होते. 

श्री. तेली म्हणाले, "सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारने फडणवीस सरकारने बजेट तरतूद करून रस्त्यांच्या कामांना दिलेली मंजुरी थांबवली असून यामध्ये जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे रखडली आहेत. प्रधान सचिव यांच्या अंतर्गत येणारे रस्ते तसेच 25/15 च्या अंतर्गत येणारे रस्ते आदी रस्त्यांची कामे यामध्ये अडकून पडली आहेत; मात्र सध्याची स्थिती पाहता काही ठराविक ठेकेदारांकडून जिल्ह्यातील महत्वाची कामे आधीच काढून ठेवण्यात आली आहेत. अशी कामे अडवून ठेवल्याने ती वेळेत पूर्ण होत नाहीत आणि याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. यामागे सत्ताधारी व अधिकारी वर्गाचे संगनमत असून याचा जाब लवकरच विचारण्यात येणार आहे.'' 

श्री. तेली पुढे म्हणाले, "जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज सोडा; पण ज्या कामांना स्थगिती दिली ती उठवली जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु मुख्यमंत्र्यांनी घोर निराशा केली. चांदा ते बांदा ही महत्त्वपूर्ण योजनेचा बट्ट्याबोळ येथील माजी पालकमंत्र्यांनी लावला. त्यापेक्षा ही योजना बंद करून मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यावर एकप्रकारे अन्याय केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT