आमदार शशिकांत शिंदे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा!
आमदार शशिकांत शिंदे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा!  
जिल्हा

आमदार शशिकांत शिंदे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा! 

सरकारनामा ब्युरो

सातारा : विधानसभेतील पक्षांच्या पक्षप्रतोदांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीला दोन राज्यमंत्रीपदे मिळतील. त्यात कोरेगावचे आमदार व राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद शशिकांत शिंदे यांचा समावेश असणार आहे. 

विधानसभेत पक्ष प्रतोदांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याबाबतचे विधेयक सर्वानुमते मंजूर झाले. पण विधान परिषदेत त्याला विरोध झाला. सुरवातीला सत्तारूढ पक्षाच्या पक्षप्रतोदांनाच राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. पण त्याला विधान परिषदेत विरोध झाल्याने त्यांनी त्यामध्ये बदल केला. पक्षाच्या आमदारांच्या संख्येवर दहा टक्के असा निर्णय घेतला. त्यानुसार भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन राज्यमंत्री पद मिळणार आहे. दहा टक्‍क्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस बसत असून त्यांना दोन राज्यमंत्री पदे मिळतील. यामध्ये विधानसभेत आमदार शशिकांत शिंदे व विधान परिषेदत हेमंत टकले यांना संधी मिळणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT