Sena Bagas Subjects Committees in Jawhar
Sena Bagas Subjects Committees in Jawhar 
जिल्हा

जव्हारमध्ये विषय समित्यांवर शिवसेनेचे बिनविरोध वर्चस्व

सरकारनामा ब्युरो

मोखाडा : जव्हार नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असून नगराध्यक्षही शिवसेनेचा आहे. त्यामुळे यंदाच्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीत पाच समित्यांवर शिवसेनेचे सभापती बिनविरोध निवडून आले, तर एका समितीवर महाविकास आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सभापती आणि उपसभापती बिनविरोध निवडण्यात आले आहेत.

बिनविरोध निवडून आलेल्या समित्यांमध्ये स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, नियोजन, कर, विकास, सांस्कृतिक कार्य क्रीडा-शिक्षण समिती सभापतीपदी पद्मा रजपूत, सार्वजनिक बांधकाम व दिवाबत्ती समिती सभापती म्हणून संगीता अहिरे, तर पाणीपुरवठा आरोग्य व स्वछता समिती सभापती म्हणून स्वप्नील औसरकर, मागासवर्गीय व अपंग कल्याण समिती सभापतीपदी संकेत माळगावी यांची बिनविरोध निवड झाली. 

बालकल्याण विकास समिती सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कमल कमळाकर कुवरे, तर विशाखा भीमराव अहिरे साळवे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. गेल्यावर्षी या समितीसाठी समसमान मते झाली होती. त्यावेळी या समितीचे सभापतीपद शिवसेनेला देण्यात आले होते, तर त्याचवेळी पुढील वर्षी हे पद राष्ट्रवादीला देण्याचे ठरले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म आणि दिलेला शब्द पाळला असल्याची माहिती नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT