Shivsena MLA Ambadas Danve Visited Ration Shops 
जिल्हा

मातोश्रीवरून आदेश येताच आमदार अंबादास दानवे यांची स्वस्त धान्य दुकानावर धडक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील शिवसेनेचे आमदार, लोकप्रतिनिधी व जिल्हाप्रमुखांना स्वस्त धान्य दुकानांवर वॉच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आमदार अंबादास दानवे यांनी आज शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेट देऊन तेथील धान्य वितरणाची तपासणी केली

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद: कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात आणि राज्यात लॉकडाऊन सुरु असुन या दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी राज्य सरकारने धान्य वितरण करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील शिवसेनेचे आमदार, लोकप्रतिनिधी व जिल्हाप्रमुखांना स्वस्त धान्य दुकानांवर वॉच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आमदार अंबादास दानवे यांनी आज शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेट देऊन तेथील धान्य वितरणाची तपासणी केली. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांची उपासमार होऊ नये यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. केंद्राकडून देखीलआलेले अतिरिक्त धान्य लाभधारकांपर्यंत वेळेत पोहोचावे यासाठी राज्य सरकारने देखील पुरवठा विभाग तसेच स्वस्त धान्य दुकान चालकांना सूचना दिल्या आहेत.

तक्रार नोंदवण्यासाठी फोन नंबरही दिला

परंतु, स्वस्त धान्य दुकानातुन गोरगरिबांना धान्य मिळत नाही अशा तक्रारी देखील प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष स्वतः धान्य वितरणाच्या ठिकाणी जावुन पाहणी केली. तसेच यासंदर्भात काही तक्रार असेल तर ती नोंदवण्यासाठी संपर्क कार्यालयातील मोबाईल क्रमांकही जाहीर केला.

कठोर कारवाईची मागणी

औरंगाबाद जिल्ह्याप्रमाणेच इंचलकरंजी, श्रीगोंदा, पुणे, अकोला, मलकापुर, कल्याण तसेच जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून स्वस्त धान्य वाटपा संदर्भातील तक्रारी जाणून घेतल्या. अनेक भागात लोकांना धान्य मिळत नसल्याचे यातून समोर आले आहे. त्यामुळे संबंधित तक्रारीचे निवारण तात्काळ करण्यासाठी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना अंबादास दानवे यांनी पत्र पाठवून धान्य वितरण न करणाऱ्या रेशन दुकान चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे देखिल वाचा --

पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोना फैलावाच्या संशयाची तबलिगी मरकजवर फिरणारी सुई राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर रोखली आहे. तबलिगीचे वसई येथे 15 व 16 मार्च रोजी होणारे संमेलन महाराष्ट्र सरकारने रोखले. मग दिल्लीमधील त्यांच्या संमेलनाला कोणी परवानगी दिली, असा सवाल देशमुख यांनी विचारला आहे. तसेच रात्री दोन वाजता डोवाल आणि तबलिगीचे मौलाना साद यांच्यात काय चर्चा झाली? या चर्चेनंतर साद फरार झाले आहेत. ते कोठे आहेत, असाही प्रश्न देशमुख यांनी विचारला आहे.........

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT