clashes in jamner
clashes in jamner 
जिल्हा

जामनेर येथे अल्पसंख्याक समाजातील दोन गटात हाणामारी : दहा जखमी

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : जिल्ह्यातील जामनेर येथे अल्पसंख्याक समाजातील दोन गटात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली यात दहा जण जखमी झाले असून त्यांना जळगाव येथे जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

जामनेर शहरातील अराफत चौकात सकाळी दहा वाजेच्या सुमारास अल्पसंख्यांक समाजाच्या दोन गटातील किरकोळ कारणावरून धारदार शस्त्रे,लाठ्या-काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली,यात दोन्ही गटामधील आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले. या सर्वांना उपचारार्थ जळगाव येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेनंतर अराफत चौकातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी बंदोबस्तात आहेत.

वाचा इतर बातम्या :  पुण्यात कोरोनाचे पाच बळी

पुण्यात कोरोनाचा  24 तांसात  तिसरा बळी गेला आहे. पुण्यातील झोपडपट्टीत राहाणाऱ्या  वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. येरवडा भागातील लक्ष्मीनगर येथील एका महिलेला श्वसनाचा त्रास झाल्यानंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाचे निदान झालेल्यांपैकी हा तिसरा मृत्यू होता. 

साठ वर्षांतील एका वृद्धाचा ससूनमध्ये, 52 वर्षीय एका नागरिकाचाही ससूनमध्ये आणि 68 वर्षीय ज्येष्ठाचा औंध रुग्णालयात मृत्यू झाला. 

पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या पाचवर पोहोचली आहे. पाचही मृत्यू झालेल्या रुग्णांचा परदेशी प्रवास झालेला नव्हता. स्थानिक संसर्गातून कोरोना झाला आणि त्यातून मृत्यू ओढवल्याचे दिसून येते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT