Two ran away from Hospital in Nagar
Two ran away from Hospital in Nagar 
जिल्हा

मुंबईहून आले.. रुग्णालयात धाडले.. तेथूनही पळाले.. अखेर पकडलेच

सरकारनामा ब्युरो

कर्जत : मुंबईहून गावी आल्याबरोबर लोकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथूनही ते पळाले व पुन्हा गावात आले. गावकऱ्यांनी पुन्हा पकडून रुग्णालयात धाडले. कर्जत तालुक्यातील एका गावातील माय-लेकाची कथा आणि व्यथा आज चर्चेची ठरली. त्यांच्या अहवालावर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कर्जत तालुक्यातील एका गावातील एक कुटुंब मुंबई येथे व्यावसायिक म्हणून स्थायिक झाले आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि त्या कुटुंबातील ६२ वर्षाची महिला आणि तिचा ४०  वर्षीय मुलगा काल अचानक गावात प्रकट झाले. मात्र गावकऱ्यांनी खबरदारी म्हणून त्यांना अगोदर तपासणी करा, मगच गावात प्रवेश मिळेल, असे बजावले. मात्र त्याच वेळी त्या दोघांना ताप, जुलाब आणि उलटया होऊ लागल्या आणि ते बेशुद्ध पडले. 

या वेळी सगळे गावकरी जमले. मात्र कोरोनामुळे त्या दोघांना हात लावायची कुणाची हिम्मत होईना. अखेर नगर येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. मात्र, काल सकाळी त्या दोघांनी धूम ठोकीत पुन्हा गाव गाठले. ही बातमी गावकऱ्यांच्या कानावर गेल्यानंतर मात्र ते संतापले. अखेर त्या दोघांना आज पुन्हा नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या मुळे त्या परिसरातील लोक घाबरून गेले आहेत.

त्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत.

त्या दोघांना कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. तो दुसरा आजार असावा. मात्र खबरदारी म्हणून त्या माय-लेकांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप पुंड यांनी सांगितले.

कर्जाचे हप्ते भरणारे झाले सावध

कर्जत तालुक्यात कोरोनाच्या भितीने सर्वच लोक सावधगिरीने व्यवहार करीत आहेत. त्याचा अनुभव आज बॅंकेत आला. ३१ मार्चपर्यंत कर्ज हफ्ता भरण्याची अंतिम मुदत आहे. मात्र उद्या गुढीपाडवा सणाची सुट्टी असल्याने आज शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र रांगेतील शेतकऱ्यांनी एक मीटर अंतर एकमेकात ठेवले होते. तसेच येथील मुख्य शाखेसह इतर सर्व चौदा शाखांत शाखेच्या प्रवेशद्वारात जंतुनाशक व पाणी हात धुण्यासाठी ठेवण्यात आले आहे. तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, मास्क व हातमोजे  देण्यात आले आहेत. या मोहिमेत आमच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांचे सहकार्य मिळत आहे, अशी माहिती जिल्हा सहकारी बॅंकेचे तालुका विकास अधिकारी युवराज तनपुरे यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT