कलेक्‍टर श्‍वेता सिंघलना उदयनराजेंकडून सोनचाफ्याची फुले! 
कलेक्‍टर श्‍वेता सिंघलना उदयनराजेंकडून सोनचाफ्याची फुले!  
जिल्हा

कलेक्‍टर श्‍वेता सिंघलना उदयनराजेंकडून सोनचाफ्याची फुले! 

सरकारनामा ब्युरो

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व सोनचाफ्याची फुले दिली. 

नुतन जिल्हाधिकारी म्हणून श्‍वेता सिंघल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज प्रथमच त्यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी सिंघल यांचे मुळगाव, तसेच तेथील त्यांच्या आठवणींवर चर्चा केली. यानंतर कास तलावाच्या कामाच्या 45 लाखांच्या निधीसंदर्भात चर्चा झाली. तसेच बाजार समितीची शिवराज पेट्रोल पंपाशेजारील जागेसंदर्भात काही सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. त्यानंतर उदयनराजेंनी श्‍वेता सिंघल यांना सोनचाफ्याची फुले भेट दिली. दोघांनी अर्धातास चर्चा केल्यानंतर उदयनराजे पुण्याकडे रवाना झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT