mp shivacharya high court case
mp shivacharya high court case 
जिल्हा

खासदार शिवाचार्य यांच्या दाखल्यावर "हिंदू लिंगायत' पण; प्रमाणपत्र "बेडा जंगम'चे : न्यायालयात तक्रार

सरकारनामा ब्यूरो

मुंबई ः लोकसभा निवडणुकीत सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जय सिद्धेश्‍वर शिवाचार्य यांनी बोगस जात प्रमाणपत्र दाखल केल्याच्या आरोपाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

अपक्ष उमेदवार आणि माजी महापौर प्रमोद गायकवाड यांनी डॉ. शिवाचार्य यांच्याविरोधात सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली आहे. खासदार शिवाचार्य यांच्या शाळेच्या दाखल्यावर "हिंदू लिंगायत' असा उल्लेख आहे; तर त्यांनी "बेडा जंगम' जातीचे बनावट प्रमाणपत्र तयार केले, असा आरोप याचिकादाराने केला आहे.

या याचिकेवर नुकतीच न्या. एस. एस. शिंदे यांच्यापुढे सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्यामध्ये सोलापूर जिल्हाधिकारी, अक्कलकोट तहसीलदार, जात पडताळणी समिती आदींचा समावेश आहे. डॉ. शिवाचार्य यांना हजर राहण्याची सूचनाही करण्यात आली असून, याचिकेवर पुढील सुनावणी 27 जानेवारीला होईल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT