ashok chavhan
ashok chavhan 
कोल्हापूर

पदभार स्वीकारताना अशोक चव्हाणांचा शाहुवाडीच्या पाटलांना फोन!

निवास चौगले

कोल्हापूर: मुलगीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नव्या गाडीची पूजा करणाऱ्या शाहुवाडी तालुक्‍यातील नागेश पाटील या युवकाला फोन करून राज्याचे माजी मुख्यमंत्री व नव्या सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या कामकाजाला आज सुरूवात केली. स्वतः श्री. चव्हाण यांनीच ही माहिती ट्‌विटरद्वारे शेअर केली आहे.

उखळू (ता. शाहुवाडी) येथील नागेश पाटील यांनी अलिकडेच नवी चारचाकी गाडी खरेदी केली आहे. या गाडीची पूजा करताना त्यांनी आपल्या मुलीच्या दोन्ही पायाला कुंकु लावून त्या पायानेच गाडीची पूजा केली. त्याचा व्हीडीओ तयार करण्यात आला. बघता बघता हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर शेअर झाला आहे.

 श्री. चव्हाण यांनी आजच कामकाजास सुरूवात केली, पण तत्पुर्वी त्यांनी एक ट्‌विट केले आहे. "लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नवीन गाडीची पूजा करणाऱ्या पित्याचा व्हीडीओ मी काल शेअर केला होता. हा व्हीडीओ बनवणारे नागेश पाटील यांचा नंबर मला रात्री मिळाला. मी आजच मंत्रालयातून कामकाजाला सुरूवात केली आणि पहिला फोन त्यांनाच केला.' असे या ट्‌विटमध्ये श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.

अलिकडे स्त्रीभ्रण हत्येचे प्रमाण वाढले आहे, त्यातून प्रती पुरूषामागे महिलांची संख्या घटत आहे. अशा परिस्थितीत मुलीच्या जन्माचे स्वागत फटाका वाजवून आणि आनंदाने करणारेही अनेकजण आहेत. उखळू येथील नागेश पाटील यांनीही मुलगी ही नकोशी नाही तर हवीशी आहे, तिचा सन्मान केला पाहीजे या भावनेतून तिच्या पदस्पर्शाने केलेली नव्या गाडीची पूजा चांगलीच चर्चेचा विषय ठरली. जिल्ह्यात श्री. पाटील यांनी शेअर केलेल्या व्हीडीओबरोबरच श्री. चव्हाण यांनी त्यावर केलेल्या ट्विटचे कौतुक होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT