Atpadi Khanapur Vidhan Sabha 2024 for development of atpadi vote to suhas babar says jaydeep bhosale 
कोल्हापूर

Atpadi Khanapur Vidhan Sabha : आटपाडीच्या विकासासाठी सुहास बाबरांना साथ द्या - जयदीप भोसले

‘‘आमदार दिवंगत अनिल बाबर यांनी पक्षाची बंधने तोडून तालुक्यात काँग्रेसशी स्नेह ठेवला होता. त्यांनी आमचे प्रश्न सोडवून न्याय दिला.

सरकारनामा ब्यूरो

आटपाडी : ‘‘आमदार दिवंगत अनिल बाबर यांनी पक्षाची बंधने तोडून तालुक्यात काँग्रेसशी स्नेह ठेवला होता. त्यांनी आमचे प्रश्न सोडवून न्याय दिला. त्यामुळे आटपाडीची काँग्रेस सुहास बाबर यांच्यासमवेत पूर्ण ताकदीने राहील,’’ अशी ग्वाही काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदीप भोसले यांनी दिली.

नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे जयदीप भोसले यांनी सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन केले होते, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक ताराजीराव पाटील, उपसभापती राहुल गायकवाड, सरपंच किरण पवार, माजी सरपच बाबासाहेब भोसले, शशिकांत देठे, विजय मेटकरी प्रमुख उपस्थित होते.

भोसले म्हणाले, ‘‘आमदार दिवंगत अनिल बाबर आणि आम्ही परस्परविरोधी पक्षात होतो. मात्र आमदार बाबर यांनी कधीही दुजाभाव केला नाही. निवडणुकीनंतर सर्व पक्षांना समवेत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका अन्य राजकर्त्यांसमोर निश्चित आदर्शवत आहे.

त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांची जबाबदारीने कामे मार्गी लावली. पक्षाच्या चौकटी मोडून आम्हाला सहकार्य केले. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षात असलो, तरी चांगला स्नेह जुळला होता. याची परतफेड करण्यासाठी आम्ही आणि आमचे कार्यकर्ते सुहास बाबर यांच्यासमवेत पूर्ण ताकदीने राहतील.’’

यावेळी सुहास बाबर म्हणाले, ‘‘दिवंगत अनिल बाबर यांनी सर्व जाती-धर्म, पक्ष असे कसलेही भेद न करता माणसं जोडली ते प्रचारात दिसते. विरोधकांवर टीका आणि त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार नाही. कारण मतदारांना सांगण्यासाठी आमच्याकडे केलेल्या कामाची यादी भली मोठी आहे.’’

संजय भिंगे, विजय पुजारी, वलवणचे शहाजी शिंदे, मोहन खरात, धावडवाडीचे उमर शेख, सदाशिव ढगे, नाथा पावणे, हणमंत मेटकरी, रावसाहेब मेटकरी, विठ्ठल ढ़बळे, शिवाजी दबडे, भारत वाघमारे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT