MLA Vaibhav Naik
MLA Vaibhav Naik sarkarnama
कोल्हापूर

`कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांचा निर्णय चुकला.. पश्चाताप होईल!`

Umesh Bambare-Patil

कोल्हापूर : काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील विश्वासाने संजय मंडलिक (Sanjay Mandlik) व धैर्यशील मा (Dhairyasheel Mane)ने या दोन खासदारांना निवडून आणले. पण, आज त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला, तो पूर्णपणे चुकीचा आहे, असे मत कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले आहे.

कोल्हापूर येथील गोकुळ शिरगांव वसाहतीत कामानिमित्त आमदार नाईक आले होते, त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, कोल्हापूरच्या या दोन खासदारांना कोणीही विधानसभा वा लोकसभेची उमेदवारी दिली नव्हती. प्रथमच या खासदारांना शिवसनेने उमेदवारी देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कोल्हापूरातील शिवसैनिकांनी जीवाचे रान करून त्यांना निवडून आणले.

पण, आज शिवसेना पक्ष अडचणीत असताना या खासदारांनी घेतलेला निर्णय हा सर्वांनाच वेदनादायी आहे. शिवसेनेत फुट पडली आहे, यामध्ये भाजपचा मोठा हात आहे. यापूर्वीही शिवसेनेवर अशी बरीच संकटे आली. पण, हा पक्ष पुन्हा नेटाने उभा राहिला आहे. यापूर्वी शिवसेना सोडून गेलेल्या खासदार व आमदारांची परिस्थिती सुध्दा आपण पहात आहोत.

भविष्यात यांना भाजप सुध्दा जवळ करेल की नाही याची खात्री नाही. कारण, विधानसभेवेळी भाजपने खास करून आमदार चंदक्रांत दादा पाटील यांनी या ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे केले होते. त्यामुळे भाजप आपल्यापद्धतीने चालत आहे. हे शिवसेनेच्या नेत्यांनी खासदारांनी ओळखायला हवे होते.

पण, त्यांनी असा निर्णय का घेतला त्यांचे त्यांनाच माहित. या निर्णयामुळे त्यांचे भविष्यात फार मोठे राजकिय नुकसान होणार आहे. लवकरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसैनिकांना बळ देण्यासाठी दौरा करणार आहेत. कोल्हापूरलाही त्यांचा दौरा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT