Chandgad Assembly Election 2024 mansing khorate vote to change and development 
कोल्हापूर

Chandgad Assembly Election 2024 : गुलामगिरीतून बाहेर पडायला साथ द्या - मानसिंग खोराटे

आमदाराचा पोरगा आमदार, खासदाराचा पोरगा खासदार. काही नाहीच झाले, तर एखाद्या मोठ्या संस्थांचे पदाधिकारी होतात.

सरकारनामा ब्यूरो

चंदगड : आमदाराचा पोरगा आमदार, खासदाराचा पोरगा खासदार. काही नाहीच झाले, तर एखाद्या मोठ्या संस्थांचे पदाधिकारी होतात. गरीब कामगार, शेतकऱ्यांची मुले आयुष्यभर फक्त कार्यकर्ते बनून झिजतात. त्यांना कुठलीही संधी दिली जात नाही. यामुळे या गुलामगिरीतून बाहेर पडायला मला साथ द्या, असे आवाहन मानसिंग खोराटे यांनी हलकर्णी येथे केले.

खोराटे म्हणाले, ‘‘आणखी किती दिवस घराणेशाहीची गुलामी करणार आहोत. या गुलामगिरीची जोखड फेकून बदल हवा, तर आमदार नवा या माझ्या संकल्पनेला साथ द्या.’’ चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.

सर्वसामान्य माणूस खोराटे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून सकारात्मक असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी ॲड. संतोष मळवीकर, जगन्नाथ हुलजी, बी. एम. पाटील, बाळाराम फडके, बाळासाहेब हळदणकर, बसवराज आरबोळे, अरुण गवळी, राजवर्धन शिंदे-सांबरेकर, बाबूराव पाटील, आनंदा जाधव, भरमू जाधव, विश्‍वनाथ ओऊळकर, उदय पाटील, सुनील शिंदे, कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT