Chandrakantdada
Chandrakantdada 
कोल्हापूर

चंद्रकांतदादा कोल्हापूरकरांना म्हणाले, आमच काय चुकलं ?

सरकारनामा

कोल्हापूर:  ज्यांनी टोल आणला,एलबीटी आणला ते जिंकले.आम्ही टोल घालविला,एलबीटी घालविला तरीही आम्ही पराभूत.आमचे चुकले तरी काय असा सवालच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला विचारला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे पानिपत झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आज पहिल्यांदाच कोल्हापूरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी असे अनेक प्रश्‍न जनतेलाच विचारले आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांनी  टोल आणला ते विजयी.आम्ही घालविला तर आम्ही चुकलो?  त्यांनी  एलबीटी लावला ते विजयी. आम्ही घालवला तर आम्ही चुकलो. त्यांनी  कोल्हापूर बकाल केले ते विजयी. आम्ही शहर सुंदर बनवायचा प्रयत्न केला तर आम्ही चुकलो. त्यांनीविमानसेवा बंद ठेवली ते विजयी.आम्ही चालू  केली तर आम्ही चुकलो. रेल्वे आहे तशी ठेवली ते विजयी. आम्ही दोनपदरी इलेक्‍ट्रिक केली तर आम्ही चुकलो.


त्यांनी  महालक्ष्मी आराखडा ज्यांनी रखडविला ते विजयी. आम्ही निधी देउन काम सुरु केलं तर आम्ही चुकलो.त्यांनी आयआरबी बोकांडी मारली ते विजयी.आम्ही घालविली तर आम्ही चुकलो.टॅंक्‍सच्या जंजाळात इतकी वर्षे ठेवली ते विजयी. आम्ही टॅक्‍स घालविले तर आम्ही चुकलो.कोल्हापूरला पदमुक्त ठेवले ते विजयी.असे प्रश्‍न पाटील यांनी विचारले आहेत.

 या प्रश्‍नांच्या मालिकेतील कांही मजकूराला हरकत घेतली असता प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी हा आमचा अधिकृत पक्षाचा मजकूर नाही. व्हॉटसऍपवरचा मेसेज आहे. असे उत्तर देउन बाजू झटकण्याच प्रयत्न केला. या पत्रकार परिषदेला पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आदी उपस्थित होते.

कोल्हापूर,सांगलीकरांनी आता दणका दिला
गेली पाच वर्षे कोल्हापूरकरांनी महायुतीला भरभरुन दिले.कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी आठ आमदार, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच महायुतीचे दोन खासदार, कोल्हापूर जिल्हा प रिषद,सांगली महापालिका, अशा अनेक महत्वाच्या सत्तास्थानावर भाजपला संधी दिली. काम करण्याची संधी दिली. 2019 च्या या निवडणुकीत मात्र कोल्हापूर,सांगलीकरांनी आम्हाला चांगलाच दणका दिला आहे.अशी कबुली देत चंद्रकांतदादा पाटील यांनी आम्ही याचे आत्मपरीक्षण करुन आणि ही पोकळी भरुन काढू.पण जनतेकडूनही आम्हाला या प्रश्‍नांची उत्तरे हवी आहेत. जनतेने आम्हाला का नाकारले,याचा आम्ही शोध घेत असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगीतले.

कोल्हापूर जिल्ह्यात निवडून आलेल्या दहाही नूतन आमदारांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच अभिनंदन केले. कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस,जनसुराज्य,शिवसेना अशा सर्वपक्षीय,अपक्ष आमदारांच्या नावाचा उल्लेख करत पाटील यांनी अभिनंदन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT