Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये पहिलीच मुंबईमध्ये बैठक झाली. महायुतीतील सर्वच आमदार, खासदार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार ही निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्धार बैठकीमध्ये करण्यात आला.
मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षनिहाय जागा वाटपाला विरोध दर्शवत ठराव्याच्या संख्येनुसारच जागा वाटप करण्याचे स्पष्ट केले. दरम्यान दुग्ध निबंधकांकडून सुरू असलेल्या अंतिम मतदार यादी नंतरच आणि ठराव गोळा झाल्यानंतरच महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. आणि याच बैठकीत जागा वाटपाचा फॉर्मुला ठरण्याची शक्यता आहे.
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) ठराव धारकांच्या याद्या अंतिम झाल्यानंतरच महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल. आतापर्यंत कोणतीच चर्चा झालेली नाही आणि बैठकही झालेली नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते.
'गोकुळ' प्रशासनाकडून कच्च्या याद्या दुग्ध विभागाला देण्यात आल्या आहेत. छाननीचे काम विभागाकडून सुरू झाले आहे. लवकरच या सर्व ठरावधारकांना दुग्ध विभागाकडून ठरावधारकांचे नाव मागणीच्या नोटिसा पाठविल्या जातील. यानंतर हरकती होतील. याचवेळी खऱ्या अर्थाने ठरावधारकांचे 'मोल' ठरणार आहे. 'गोकुळ'मध्ये अंतर्गत बऱ्याच हालचाली सुरू आहेत.
सध्या केवळ याद्यांचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. जोपर्यंत याद्या अंतिम होत नाहीत, तोपर्यंत पुढील बैठका होणार नाहीत. महायुती म्हणून निवडणूक लढविताना सर्व नेतेमंडळीची एकत्रित बैठक होणे आवश्यक आहे. सध्या याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
जागा वाटप वगैरे काहीच चर्चा नाही. याद्या अंतिम झाल्यानंतर महायुतीची बैठक होईल. त्यामध्ये पुढील सर्व धोरण, जागा वाटप ठरेल. सध्या तरी आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.