Kolapur News: कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वादाचा मुद्दा बनलेल्या गोकुळ दूध संघाबाबत आता राज्य सरकार मैदानात उतरणार आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसांत घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्याबाबत अधिक स्पष्टीकरण आणि निवडणूक प्रक्रिया कालावधी वाढवून मिळण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
90 दिवसांमध्ये निवडणूक घेण्यासाठी सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया समजून घ्यावी लागणार आहे. न्यायालयाकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरण गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया पुढील कारवाई करणार आहे.
गोकुळ दूध संघातील अवसायानात निघालेल्या 1320 दुध संस्थांची सुनावणी प्रक्रिया 80 दिवसात पूर्ण करून पात्र अपात्रतेवर निर्णय घेऊनच मग गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्याचे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने दिले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य शक्तीच्या काही दूध संस्थांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने गोकुळच्या निवडणुका 90 दिवसात घेण्याचे आदेश दिले.
मात्र हे आदेश देत असताना सर्किट बँकेच्या निकालावर कोणताच आक्षेप घेतला नाही. त्यामुळे आवसायानात निघालेल्या 1320 संस्थांची चौकशी 80 दिवसात पूर्ण करायची आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 90 दिवसात निवडणुका घ्यायची यासंदर्भात सहकार निवडणूक प्राधिकरणाला संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत संभ्रम निर्माण झाला असताना विभागीय उपनिबंधक कार्यालयाकडून या संदर्भात सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागविले आहे. तर प्राधिकरणाने राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यामुळे याबाबत अधिक स्पष्टीकरण घेण्यासाठी राज्य सरकारच आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात निवडणूक कालावधी वाढवून मिळावा, अशी मागणी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात करण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.