Gokul's Disqualified Societies News  Sarkarnama
कोल्हापूर

Gokul Milk Union Politics: गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट! अरुण डोंगळे, सतेज पाटलांचं ठरलं; अपात्र संस्थेवरून घेतला निर्णय

Gokul's Disqualified Societies News: गोकुळ दूध संघातील 427 संस्थांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील आणि माजी अध्यक्ष अरुण डोंगळे आक्रमक झाले असून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: दुग्ध निबंधक विभागाने गोकुळ मधील 427 संस्था मतदानासाठी अपात्र ठरवल्या आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यातील 541 संस्था देखील मतदानास अपात्र केल्या. या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत.

गोकुळ संस्थेतील संस्था अपात्र केल्याच्या मुद्द्यांवरून न्याय मागण्यासाठी दोघांचीही भूमिका एकच आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी न्यायालयात धाव घेण्याची भूमिका घेतली आहे.

गोकुळ दूध संघ हा मल्टिस्टेट होऊ नये, यासाठी आमचा लढा कायम असेल. तो जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाच दूध संघ राहिला पाहिजे, संघात चांगल्या विचारांची माणसं गेली पाहिजेत, अशी भावनिक साद घालत गोकुळमध्ये महायुतीतील भावकीचा वाद आता दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आला आहे.

महायुतीच्या अंतर्गत वादाचा फटका ४२७ दूध संस्थांना बसला आहे. ज्या दूध संस्था अपात्र झालेल्या आहेत, त्या दूध संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी आज दिली. भुये (ता. करवीर) येथे संजय पाटील यांच्या गोठ्यास भेट देऊन आमदार सतेज पाटील यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, 'गोकुळ दूध संघाच्या ५४७० संस्थेची यादी अंतिम केली होती. यापैकी १३२० दूध संस्था अवसायनात असल्याची तक्रार महादेव दूध संस्थेने केली होती. विभागीय निबंधक यांच्या कार्यालयांतर्गत सुनावणी होऊन एकूण ४२७ दूध संस्था अपात्र करण्याचा निर्णय दिला आहे. भावकीच्या वादात दूध उत्पादकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप आमदार सतेज पाटलांनी केला. ज्या दूध संस्थांमुळे गोकुळच्या दूध संकलनात भरघोस वाढ होत आहे. आतापर्यंत ज्यांनी गोकुळसाठी कष्ट घेतले, अशा दूध संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे पाप महायुतीने केले आहे.'

दरम्यान गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे सध्या मुंबईत आहेत. फोनवरून त्यांना संपर्क केला असता त्यांनी अपात्र झालेल्या संस्थेच्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ राजकीय षडयंत्र म्हणून जाणून बुजून या संस्था अपात्र केल्या आहेत. त्या संदर्भात न्याय मागण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाऊ असा इशारा देखील डोंगळे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT