Hasan Mushrif Sarkarnama
कोल्हापूर

Hasan Mushrif Over Farmer Debt : सोनाळीच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू - हसन मुश्रीफ

सोनाळी येथील शेतीच्या पाण्यासाठी श्री नागनाथ पाणीपुरवठा संस्था उभारणीला भूविकास बँक आणि जिल्हा बँकेचे कर्ज दिले होते.

सरकारनामा ब्यूरो

सोनाळी : सोनाळी येथील शेतीच्या पाण्यासाठी श्री नागनाथ पाणीपुरवठा संस्था उभारणीला भूविकास बँक आणि जिल्हा बँकेचे कर्ज दिले होते. अडीअडचणींमुळे ही संस्था थकीत जाऊन बंद पडली. त्यानंतर आधी भूविकास बँकेने कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि आता जिल्हा बँकेतर्फे कर्जमाफी करून शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्त करू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

सोनाळी (ता. कागल) येथील प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रामभाऊ शेणवी होते. माजी खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, ‘मतदारसंघातील प्रत्येक कामाला पालकमंत्री मुश्रीफ यांचा हात लागला आहे. विकासकामांच्या माध्यमातून तालुक्याचा कायापालट झाला आहे.’ पंचायत समितीचे माजी उपसभापती भूषण पाटील म्हणाले, आज विरोधक कोणत्या मुद्द्यावर मते मागायला येतात? हेच समजत नाही.’

अंबरीशसिंह घाटगे, पी. व्ही. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बिद्रीच्या माजी संचालिका कमल चौगुले, मंडलिक साखर कारखान्याचे संचालक एन. एस. चौगले, रणजित शेणवी, सीताराम लोंढे, उमाजी पाटील, आनंदराव भिउंगडे, सागर चौगुले, माजी सरपंच अशोक चौगुले, अनिल पाटील, समाधान म्हातुगडे, रमेश कोरे, बसू कोरे, सतीश भिउंगडे उपस्थित होते.

समरजित घाटगे स्वार्थी, मतलबी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, ‘समरजित घाटगे हे स्वार्थी, मतलबी आणि वापरा आणि फेका अशा प्रवृत्तीचे आहेत. भाजपचा वापर त्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतला. ज्यावेळी पक्ष संघटनेला काही देण्याची वेळ आली, त्यावेळी मात्र ते लाचार होऊन पळून गेले.’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT