Hasan Mushrif  Sarkarnama
कोल्हापूर

Hasan Mushrif : ‘शक्तिपीठ’अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास निवडणुकीतून माघार घेतो -हसन मुश्रीफ

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करून कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्दची अधिसूचना काढून घेतली.

सरकारनामा ब्यूरो

सिद्धनेर्ली : ‘शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करून कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्दची अधिसूचना काढून घेतली. ही अधिसूचना खोटी आणि फसवी असल्याचा अपप्रचार समरजितसिंह घाटगे करीत आहेत. त्यांनी ती अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास अजूनही निवडणुकीतून माघार घेतो’, असे आव्हान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

सिध्दनेर्ली (ता. कागल) येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘विकासाचे मोठे काम मी करून दाखविले आहे. त्यामुळे मी मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. राज्यात आमचे सरकार स्थापन होणार असून, चांगले काम करण्याची पुन्हा मला संधी मिळणार आहे. लोकहित व जनकल्याणाच्या दृष्टीने चांगले निर्णय घेण्याची शक्ती जागृत देवस्थान श्री. सिद्धेश्वराने मला द्यावी.’

दादासाहेब पाटील यांनी स्वागत केले. यावेळी शुभांगी पाटील, सायली आगळे, भाजप तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील, गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. एम. बी. पाटील, व्ही. जी. पवार, राहुल महाडिक, विनायक आगळे, सरपंच दत्तात्रय पाटील, कृष्णात मेटील, माजी सभापती पूनम मगदूम-महाडिक, माजी सरपंच सुरेखा पाटील, मनोहर लोहार, संदीप पाटील, रामजी घराळ, कबीर कांबळे, उपसरपंच वनिता घराळ, कल्याणी कुरणे आदी उपस्थित होते.

समरजितसिंह घाटगेंच्या म्होरक्‍यांचा पर्दाफाश करणार पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘सिद्धनेर्लीत समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत जयसिंगराव घाटगे पतसंस्था आहे. संस्थेचे मॅनेजर तानाजी जालिंदर पाटील यांचे दहा महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे.

त्यांच्या सह्या नसलेली त्यांच्या नावाची कर्ज प्रकरणे दाखवून मृत्यूनंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून एक कोटी ८५ लाखांची वसुली लावली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब या तणावाखाली चिंताग्रस्त आहे. या कुटुंबीयांच्या पाठीशी मी ठाम उभा आहे. निवडणूक होताच या प्रकरणात हात असलेल्या समरजितसिंह घाटगे यांच्या म्होरक्यांचा पर्दाफाश करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे.’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT