Hasan Mushrif Sarkarnama
कोल्हापूर

Hasan Mushrif : पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिले मराठा आरक्षणाला पाठबळ - दत्ताजीराव देसाई

‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नेहमी आग्रही राहून मराठा समाजाला पाठबळ दिले.

सरकारनामा ब्यूरो

कडगांव : ‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नेहमी आग्रही राहून मराठा समाजाला पाठबळ दिले. आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या क्रांती मोर्चामध्येही ते हिरीरीने सहभागी झाले,’ असे प्रतिपादन महासंघाचे राज्याध्यक्ष दत्ताजीराव देसाई यांनी येथे केले.

कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत देसाई बोलत होते. ‘गोडसाखर’चे अध्यक्ष प्रकाश पताडे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक बाळासाहेब देसाई प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘पाटबंधारे खात्याची काही महिन्यांकरिता माझ्याकडे जबाबदारी आली. तेव्हा आंबेओहळ उचंगी, नागणवाडी या प्रकल्पांना निधी दिला. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पॅकेज आणले.

आंबेओहोळ प्रकल्पाची पूर्तता करूनच तुमच्यासमोर मते मागायला आलो आहे. मला साथ द्या. ज्यावेळी हा मतदारसंघ कागल मतदारसंघाला जोडला गेला, तेव्हापासून फार मोठे काम उभे केले. दळणवळण, पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत.

एकूणच कागल विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत सात हजार कोटी रुपयांचा निधी आणता आला. त्यामुळे इतकी प्रचंड विकासकामे केली आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी द्या.’

या सभेला सरपंच अर्चना पाटील, उपसरपंच सचिन सावंत, माजी सरपंच संजय बटकणंली, सदानंद पाटील, नेताजी पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, बंटी पाटील, सुदर्शन पाटील, संग्राम घाटगे आदी उपस्थित होते.

‘गोडसाखर’ यंदाचा हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण करणार पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘ज्या-ज्या वेळी गोडसाखर कारखाना अडचणीत आला. त्यावेळी आपण सर्व ताकदीनिशी मदत केली. सुरुवातीला ५५ कोटी रुपये, नंतर ४९ कोटी रुपये जिल्हा बँकेतून कर्जपुरवठा केला. नोकरांचे पगार भागवले. आठ वर्षे हा साखर कारखाना सुरळीत चालला होता, मात्र अडचणी निर्माण केल्या. आता पुन्हा मी तुम्हा सर्वांना खात्री देतो, हा साखर कारखाना यंदाचा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण करेल.’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT