कोल्हापूर

समरजितसिंह घाटगे हे जमीनीच्या तुकड्यांचे वारस : हसन मुश्रीफ 

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : पुरोगामी विचारांचे पाईक असलेले छत्रपती शाहू महाराज कायम जातीयवाद्यांविरुद्ध लढले. त्यांनी महाराजांना किती त्रास दिला हे सर्वांना माहित आहे. पण त्यांचे वारस आज जातीयवादी पक्षासोबत आहेत. ते असतील शाहू महाराजांच्या जमीनीच्या तुकड्यांचे वारस पण आम्ही महाराजांच्या विचाराचे वारस आहोत, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी आज "म्हाडा' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना लगावला. 

श्री. मुश्रीफ म्हणाले,"गडहिंग्लजला श्री. घाटगे यांनी संभाजी भिडे गुरूजींचे व्याख्यान ठेवले. या कार्यक्रमात श्री. भिडे यांनी माझ्यावर जातीयवादाचा आरोप केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून श्री. घाटगे बसले होते, जर याठिकाणी शाहू महाराज असते तर श्री. भिडे यांना त्यांनी असे बोलूच दिले नसते. 22 एप्रिलला ते आंबेडकर जयंती साजरी करणार आहेत. या कार्यक्रमासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातेवाईकांना निमंत्रित केले आहे. त्या नातेवाईकांना हे सर्व माहित नसावे.' 
ते म्हणाले,"कागलची लढाई ही वैचारिक आहे. इथे राजा विरूध्द प्रजा, गरीब विरूध्द श्रीमंत असा सामना आहे. 29 एप्रिल रोजी आम्हीही कागलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहोत. या कार्यक्रमाला जोगेंद्र कवाडे प्रमुख उपस्थित आहेत. याशिवाय प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

2019 ला तुम्ही आम्हाला संधी द्या, 2024 ला तुम्हाला देतो असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सांगतात, पण ही लोकशाही आहे, त्यात असे कधी होईल का ? असा सवाल उपस्थित करून श्री. मुश्रीफ म्हणाले,"भाजपाचे पुर्वाश्रमीचे नेते यशवंत सिन्हाच म्हणतात सर्व विरोधक एकत्र आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव अटळ आहे.' 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT