Vishwajeet Kadam Indian National Congress
Vishwajeet Kadam Indian National Congress 
कोल्हापूर

सरकार कुणाचेही असो, माझ्यात विकासकामे करण्याची हिम्मत : आमदार डॉ. विश्वजित कदम 

सरकारनामा ब्युरो

कडेगाव : ''पलूस-कडेगाव मतदारसंघासाठी कदम कुटुंबीय सतत वेळ देते. येथील जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होते. तेव्हा कोणीही मनात शंका ठेवू नका. सरकार कुणाचेही असो सरकारला वाकवून विकासकामे करण्याची हिंमत विश्वजित कदम याच्यात आहे,'' असा विश्वास आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. येथे सागरेश्वर सहकारी सूत गिरणीच्या कार्यस्थळावर कार्यकर्त्यांशी डॉ. विश्वजित कदम यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

कदम म्हणाले,"डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला. शिक्षण, सहकार, सिंचन, कृषी, औद्योगिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करून मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. तीन वेळा आलेल्या महापुरात लोकांना सर्वतोपरी मदत केली. साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला दरही दिला. तर सिंचन योजनांच्या माध्यमातून कडेगाव या दुष्काळी तालुक्‍याचे नंदनवन केले.''

ते पुढे म्हणाले, ''निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहिली तर पलूस तालुक्‍यातून सातत्याने चांगले मताधिक्‍य मिळत आहे. तर याबाबत कडेगाव तालुका का? मागे आहे. याचे कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. येथील कार्यकर्तेही काही कमी नाहीत, तेव्हा येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्यांने ठरवले तर सन 2014 पेक्षा आता जादा मताधिक्‍य मिळण्यास काहीच अडचण नाही. तसेच डॉ. पतंगराव कदम साहेब व मोहनराव कदम यांनी आतापर्यंत केलेल्या विकासकामांची पोचपावती या निवडणुकीत निश्‍चित मिळणार आहेच, शिवाय येथील सर्वसामान्य जनतेचा आशीर्वादही मिळणार आहे.'' यावेळी तालुक्‍यातील मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT