Ichalkaranji Assembly Election 2024  
कोल्हापूर

Ichalkaranji Assembly Election 2024 : ज्यांचा विकासाशी संबंध नाही, ते विकासाच्या गप्पा मारताहेत - आमदार प्रकाश आवाडे

‘ज्यांचा कधी विकासाशी संबंधच आला नाही ते विकासकामांच्या गप्पा मारत आहेत. काम न केल्यामुळे विकासाच्या मुद्यावर बोलता येत नाही, म्हणूनच आमच्यावर व्यक्तिगत टीका करून सवंग प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत;

सरकारनामा ब्यूरो

इचलकरंजी : ‘ज्यांचा कधी विकासाशी संबंधच आला नाही ते विकासकामांच्या गप्पा मारत आहेत. काम न केल्यामुळे विकासाच्या मुद्यावर बोलता येत नाही, म्हणूनच आमच्यावर व्यक्तिगत टीका करून सवंग प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत; पण सुज्ञ जनता त्यांना भाळणार नाही, तर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला साथ देईल. त्यामुळे राहुल आवाडे हेच आमदार होणार’, असा विश्‍वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ रायगड कॉलनी येथे महिला मेळावा झाला. त्याप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते. या मेळाव्यास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी ताराराणी महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा नजमा शेख, भाजप महिला आघाडी शहर अध्यक्षा अश्‍विनी कुबडगे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मिश्रिलाल जाजू, हरिश लाटणे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, संजय केंगार आदींनी आपल्या मनोगतात आवाडे हे केवळ बोलत नाहीत, तर जे बोलतात ते करून दाखवतात, जनतेने दिलेला विश्‍वास ते कधीच ढळू देणार नाहीत; परंतु विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच नसल्याने ते केवळ व्यक्तिगत टीका करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष न देता राहुल आवाडे यांना विक्रमी मताधिक्य कसे मिळेल यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन केले.

याप्रसंगी माजी नगरसेविका सुनिता लाटणे, पुष्पराज लाटणे, श्रेणिक मगदूम, राजू दरीबे, मारुती पाथरवट, शफिक बागवान, संतोष कांदेकर, सर्जेराव हळदकर, राहुल जानवेकर, बिलाल पटवेगार, अमित लिपारे, याकूब मुजावर, मेहबूब मुजावर, बाळासो जाधव, अशोक भागवत, संजय पाटील, बाळू चव्हाण, बाळू सागावकर, सुरेश पाटील, सुनील गोरे, आकाश बेडगे, उमेश गोरे, पांडुरंग बेल्याळ, जगदीश जाधव, सदा कुमठे, महाराणा प्रताप युवक मंडळ, मित्रोदय तरुण मंडळ यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT