Congress Leader Satej Patil Sarkarnama
कोल्हापूर

Tata Airbus : गुजरातला वेगळा देश निर्माण होणार आहे का... सतेज पाटलांचा सवाल

एअरलाईन्सचे प्रमुख ऑफिस मुंबईहून Mumbai नोएडाला Noida गेले, मुंबईचे Mumbai महत्त्व कमी करणे हा एकच अजेंडा भाजपचा BJP असल्याचे ते म्हणाले.

Umesh Bambare-Patil

कोल्हापूर : देशाचं सरकार एका राज्यासाठी चाललंय का असा प्रश्न निर्माण होत असून डायमंड इंडस्ट्री, बुलियन ट्रेडिंग अशी महत्त्वाची केंद्रे गुजरातला गेलीत. त्यामुळे गुजरात एक वेगळा देश निर्माण होणार आहे का अशी शंका आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.

नागपूरमधील प्रस्तावित टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर रणंकदन सुरू झाले आहे. तीन महिन्यात तीन प्रकल्प गेल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी सडकून टीका केली आहे.

सतेज पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे राजकीय वजन कमी पडतंय हे आता लोकांच्या लक्षात आलंय. देशाचं सरकार एका राज्यासाठी चाललय का असा प्रश्न निर्माण होत आहे. डायमंड इंडस्ट्री, बुलियन ट्रेडिंग असे अशा महत्त्वाच्या केंद्र गुजरातला गेली, त्यामुळे गुजरात एक वेगळा देश निर्माण होणार आहे का अशी शंका आहे.

देशाची सगळी संपत्ती एका राज्यात घेऊन जाण राज्यावर अन्यायकारक आहे, एअरलाईन्सचे प्रमुख ऑफिस मुंबईहून नोएडाला गेले, मुंबईचे महत्त्व कमी करणे हा एकच अजेंडा भाजपचा असल्याचे सतेज पाटील म्हणाले.

शहराची खड्ड्यांमुळे विदारक अवस्था झाली आहे. महापालिकेतील अभियंत्याची आईचाही खड्ड्यामुळे अपघाती मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, लोकप्रतिनिधी नसणे हे शहराच्या जिल्ह्याच्या दृष्टीने घातक असल्याचे सांगत त्यांनी महापालिका निवडणुका न झाल्याचा परिणाम विकासकामांवर दिसत असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारने देखील यासाठी अजून निधी द्यावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT