Islampur Assembly Election 2024 nishikant patil over vote for change and best development ahead politics 
कोल्हापूर

Islampur Assembly Election 2024 : न्याय हक्कासाठी परीवर्तन करा - निशिकांत पाटील

इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील जनतेने विकासाची स्वप्ने पाहीली,आता स्वप्ने दाखविणाऱ्यांना नको ती स्वप्ने पडु लागली आहेत.

सरकारनामा ब्यूरो

इस्लामपूर : इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील जनतेने विकासाची स्वप्ने पाहीली,आता स्वप्ने दाखविणाऱ्यांना नको ती स्वप्ने पडु लागली आहेत. खऱ्या अर्थाने येथील जनतेला, सार्वजनिक सुविधा मिळाल्या नाहीत, हि लढाई आपल्या न्याय हक्काची आहे, परिवर्तनासाठी कोणत्याही दबावाला व अमिषाला बळी पडु नका असे मत इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी व्यक्त केले.

इस्लामपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निशिकांत भोसले-पाटील यांनी इस्लामपूर शहरातील प्रभागनिहाय संपर्क दौरा केला. त्यावेळी त्यांनी मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील प्रमुख उपस्थित होते.

निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, गेली ३५ वर्षे ज्यांनी सत्ता भोगली. त्यांनी केलेली विकासकामे व मी कोणतेही मंत्रिपद नसताना माझ्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात महायुती सरकारच्या माध्यमातून इस्लामपूर शहरासह इस्लामपूर विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे याचा आपण विचार करावा.

विद्यमान आमदारांनी इस्लामपुरातील जनतेला आजपर्यंत फक्त बारामतीचे स्वप्ने दाखवली. पण सत्यात काही उतरले नाही. येथील मूलभूत प्रश्न जैसे थे आहेत. मी माझ्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या काळात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लावली. मी तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहे.

तुमचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मला एक संधी द्या. मी तुम्हाला शब्द देतो की, येणाऱ्या पाच वर्षात २४ बाय ७ पाणी योजना, स्ट्रीट लाईट, अंडर ग्राउंड ड्रेनेजसह बारामती पेक्षा ही चांगला विकास तुम्हाला करून दाखवतो. तुम्ही सर्व माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहशीला, यात मला कोणतीच शंका नाही. यावेळी इस्लामपूर शहरातील महायुती घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT