Islampur Assembly Election 2024 will change everything says sunita bhosale patil . sarkarnama
कोल्हापूर

Islampur Assembly Election 2024 : इस्लामपूर मतदारसंघात परिवर्तन घडणार - सुनीता भोसले-पाटील

‘‘गत पाच वर्षांत कोरोना असो, महापूर, सगळ्या संकटात निशिकांत भोसले-पाटील आपल्या पाठीशी खंबीरपणे राहिले.

सरकारनामा ब्यूरो

इस्लामपूर : ‘‘गत पाच वर्षांत कोरोना असो, महापूर, सगळ्या संकटात निशिकांत भोसले-पाटील आपल्या पाठीशी खंबीरपणे राहिले. ते पाच वर्षे राबले, काय करू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. आता आपली जबाबदारी आहे, त्यांना पाच वर्षे संधी देण्याची.

तेव्हा महिलांनी भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून निशिकांत पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन विधानसभेत पाठवावे,’’ असे आवाहन सुनीता भोसले-पाटील यांनी केले.

महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. त्यांनी साखराळे, हुबालवाडी, खरातवाडी, बहे, नरसिंहपूर, कोळे, शिरटे परिसरात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या व संवाद साधला. यावेळी तैसीन आत्तार, सुरेखा जगताप प्रमुख उपस्थित होत्या.

सुनीता भोसले-पाटील म्हणाल्या, ‘‘गत निवडणुकीत पराभूत झाले, तरीही निशिकांत पाटील दुसऱ्या दिवशी कामाला लागले. त्यांनी केवळ पक्षसंघटन वाढवले नाही, तर ते प्रत्येकासाठी संकट काळात धावून आले.

त्यांचे महापुरातील काम ‘कृष्णा’काठचा माणूस कधीच विसरू शकणार नाही. विद्यमान आमदारांना तुम्ही ३५ वर्षे संधी दिली. मात्र मतदारसंघाच्या बाहेरचा आमदार करून तुम्हाला काय मिळाले? तुम्ही ज्यांना साहेब म्हणतात, ते आपल्याशी कुटुंबप्रमुख म्हणून वागतात का? महायुती सरकारने जनतेवर योजनांचा पाऊस पाडला आहे.

एसटीपासून ते दवाखान्यापर्यंत, लाडकी बहीण ते शालेय शिक्षणापर्यंत, मोफत राशन अशा सर्वच गोष्टीमध्ये नागरिकांना लाभ होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा तुम्हाला ५० रुपये तरी मिळाले का? म्हणून हे महायुती सरकार पुन्हा येण्यासाठी आपण सर्वांनी आत्मचिंतन करून बदल घडवा व निशिकांत पाटील यांना विधानसभेत पाठवा.’’ यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT