Sanjay Mandlik, Hasan Mushrif, Prakash Abitkar Sarkarnama
कोल्हापूर

Kagal Election 2025 : कागलमध्ये दोन मंत्र्यांत 'टफ फाईट', मंडलिकांच्या मदतीला पालकमंत्र्यांची फौज, उमेदवारांचं अज्ञातस्थळी 'हॉटेल पॉलिटिक्स'

Kagal News : कागल नगरपालिका निवडणुकीत मुश्रीफ-आबिटकर यांच्यात फाईट होत असून गटबाजी, दबाव तंत्र आणि हॉटेल पॉलिटिक्समुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक चुरस कागल नगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळत आहे. महायुती मधील दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यानंतर त्याची रंगत आणखीन वाढली आहे. त्यातच या नगरपालिका निवडणुकीत एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी घाटगे आणि मुश्रीफ अनपेक्षितपणे एकत्र आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघे एकत्र आल्यानंतर माझी खासदार संजय मंडलिक यांचा गट एकाकी पडला आहे. आता म्हणली की, यांच्या मदतीलाच त्यांच्याच पक्षाचे नेते आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर धावले आहेत. कागल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध मंत्री प्रकाश आबिटकर गट यांचा सामना रंगणार आहे.

मंत्री मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आल्यानंतर शिवसेना शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक मात्र एकाकी पडले आहेत. कोणत्याही परिस्थितीत कागल नगरपालिका निवडणूक लढवायची असा ठाम निर्धार केलेल्या माजी खासदार मंडलिक यांनी घाटगे आणि मंत्री मुश्रीफ यांच्या पॅनल विरोधात उमेदवार दिले आहेत. मात्र राजकीय दबाव तंत्र वापरून एकाही उमेदवाराला माघार घ्यावी लागू नये, यासाठी माजी खासदार मंडलिक यांनी विशेष काळजी घेतली आहे.

त्यासाठी त्यांच्या मदतीसाठी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उतरले आहेत. शिवसेना शिंदे पक्षाचे कोणतेही उमेदवार फुटू नयेत किंवा माघार घेऊ नये यासाठी आता उमेदवारांनाच गोवा राज्यात अज्ञात स्थळी हलवण्यात आलं आहे. राज्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे देखील दुपारनंतर या उमेदवारांना भेटण्यासाठी गोव्यात जाणार आहेत. आता अर्ज माघारीची मुदत संपून गेल्यानंतरच उमेदवार कागलमध्ये परतणार आहेत.  

मुश्रीफ आबिटकर यांचा पुन्हा संघर्ष

कोल्हापूर जिल्ह्यात हे दोन कॅबिनेट मंत्री एकमेकांच्या विरोधात उभे राहत असल्याची पहिल्यांदाच घटना घडत आहे. तेही नगरपालिका निवडणुकांसाठी. यापूर्वी सहकाराच्या निवडणुकीत मुश्रीफ आणि आबिटकर यांच्यात बिद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक आणि कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संघर्ष झालेला पाहायला मिळाला. तर राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुश्रीफ (Hasan Musrif) यांना केवळ 11 महिने पालकमंत्री पदावर येण्याची संधी मिळाली.

मात्र 2024 च्या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ आणि आबिटकर यांच्यात पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच निर्माण झालेली पाहायला मिळाली. तेव्हापासून या नेत्यांमध्ये राजकीय शीतयुद्ध संधी मिळेल तेव्हा सुरूच आहे. त्यामुळे आता हसन मुश्रीफ आणि समरजित यांची युती झाल्याने संजय मंडलिक यांच्यासाठी आता प्रकाश आबिटकर यांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT