Kolhapur Assembly Election 2024 uday samant and kshirsagar big industry says shrikant shinde 
कोल्हापूर

Kolhapur Assembly Election : उद्योगमंत्री सामंत, क्षीरसागर यांच्या माध्यमातून मोठे उद्योग - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

‘राज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात उद्योगमंत्री उदय सामंत आणि राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून मोठे उद्योग येत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : ‘राज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात उद्योगमंत्री उदय सामंत आणि राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून मोठे उद्योग येत आहेत. गुंतवणूक वाढीसाठी आमचे विशेष प्रयत्न आहेत. त्यामुळे महायुती सरकारच्या पाठीशी राहावे, महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना मताधिक्य द्यावे’, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. कोल्हापुरात उद्योजकांसाठी आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, ‘जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होण्यासाठी चार नवीन एमआयडीसी होण्याच्या मार्गावर आहेत. या ठिकाणी मोठे उद्योग येत आहेत. यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी नियोजन केले आहे.

कोल्हापुरात आयटी सेक्टर उभे करण्यासाठी आमचे कृतिशील प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात मोठी गुंतवणूक येईल. कोल्हापुरात पॉलिटिक्स जास्त, डेव्हलपमेंट कमी, अशी अनेक वर्षे परिस्थिती आहे.

आता आम्ही कोल्हापूर-वैभववाडी, बेळगाव-कोल्हापूर-कराड-सातारा-पुणे रेल्वे मार्ग लवकरात लवकर उभा करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. कोल्हापुरात आयटी पार्कसाठी जागा देण्यात आली आहे. त्याचे काम हे लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे नोकरीत खूप मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.’

ललित गांधी यांनी सर्वसामान्यांचे तसेच सर्वांचे ऐकणारे आणि सोल्युशन देणारे सरकार असल्याचे सांगितले. उद्योजक संजीव परीख म्हणाले, ‘मालावरती मार्केट सेस लागतो तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली. छोटे उद्योजक जगण्यासाठी मॉलवर शासनाने पॉलिसी करावी.

मायनर मिनरल्स लायसन एक ऐवजी तीन ते पाच वर्षांसाठी करण्यात यावे, अशी मागणी शेखर कुसाळे यांनी केली. महापालिकेचे गाळे भाडे कमी करण्यात यावे, अशी मागणी अमोल नष्टे यांनी केली. अंबाबाई विकास आराखडा मार्गी लावत असताना ४०० व्यापाऱ्यांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे, अशी मागणी किरण नकाते यांनी केली.

यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष (कॅट) उद्योजक धैर्यशील पाटील, चंद्रकांत कोरगावकर, अमोल कापसे, संतोष पाटील यांनी सूचना मांडल्या. खासदार धैर्यशील माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सत्यजित जाधव, सत्यजित कदम, ऋतुराज क्षीरसागर, कृष्णराज महाडिक, संदीप नष्टे, आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT