Satej Potil On Kolhapur Lok Sabha Seat : Chhatrapati Shahu Maharaj Sarkarnama
कोल्हापूर

Kolhapur Lok Sabha Seat : 'शाहू महाराजांबद्दल आदर असेल तर बिनविरोध...' ; सतेज पाटलांचं विरोधकांना आव्हान!

Rahul Gadkar

Kolhapur Political News : महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीबाबत महायुतीतील नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सातत्याने विधाने करताना दिसत आहेत. श्रीमंत शाहू महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत उभे राहू नये, असे आवाहन ते करत असल्याचे दिसत आहे. मात्र, त्यावरून आता कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना सणसणीत उत्तर दिले आहे. जर श्रीमंत शाहू महाराज तुमच्यासाठी आदर्श असतील तर ही निवडणूक बिनविरोध करा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. (Latest Marathi News)

सतेज पाटील म्हणाले, "महाविकास आघाडीचे एकमत आहे. केवळ भाजपला पराभूत करणे हेच आमचे ध्येय आहे. आमचं धोरण पक्कं ठरलं आहे. सक्षम उमेदवार देणे आणि भाजपच्या विरोधात निवडून आणणे, हे आमचे धोरण असल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या लोकसभा निवडणुकीच्या माघारीवरून सतेज पाटील यांनी संभाजीराजे यांचे आभार मानले आहेत. 'घर म्हणून त्यांची जबाबदारी होती आणि तसाच स्तुत्य निर्णय त्यांनी घेतला आहे. आम्ही त्यांनासुद्धा वारंवार विनंती केली होती. शाहू महाराजांनी ही निवडणूक लढवावी, हे पुरोगामी विचार दिल्लीपर्यंत जावेत,' हा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

'शाहू महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुद्दीची कीव येते. वैयक्तिक टीका करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील. आदराचे स्थान असेल तर त्यांना बिनविरोध निवडून द्यावे,' असे आवाहन शाहू महाराज यांच्या उमेदवारीवर शंका उपस्थित करणाऱ्या महायुतीतील नेत्यांना सतेज पाटलांनी केले.

'महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून आम्ही ताकदीने सामोरे जाऊ. आमच्या महाविकास आघाडीच्या किमान जागांवर चर्चा आहेत, पण महायुतीत अजूनही गोंधळ आहे, असे बोलत सतेज पाटील यांनी इतिहासात न जाता भविष्याचा वेध मी घेणार आहे. राज्यात जनता विरोधात महायुती अशी लढाई असणार आहे. जनता स्वतः ही निवडणूक हातात घेणार आहे. लोकांनी जे ठरवले आहे, ते लोकसभेच्या (Lok Sabha) निकालात दिसून येईल,' असेही पाटील यांनी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT