कोल्हापूर

मंडलिकांना म्हातारा बैल म्हणताना लाज का नाही वाटली? 

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : शाहू, फूले, आंबेडकरांच्या नावाप्रमाणेच दिवगंत राजे विक्रमसिंह घाटगे व लोकनेते सदाशिवराव मंडलिकांच्या नावांचा वापर केला. सदाशिवराव मंडलिकांनी मला घडवलं, आज जे काय आहे ते मंडलिकांच्यामुळेच आहे, असे रडून सांगणाऱ्या आमदार मुश्रीफांना दिवंगत मंडलिकांना म्हातारा बैल आणि विमानातून ढकलून द्या, असे म्हणताना लाज का नाही वाटली? अशी घणाघाती टीका भाजप नेते, म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. 

म्हाकवे येथे शेतकरी युवक मेळावा व युवक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यस्थानी शाहू साखर कारखान्याचे संचालक पी. डी. चौगुले होते. 
बाजार समितीच्या संचालिका आशालता पाटील, आनंदराव पाटील, सुहास लटोरे, कोल्हापूरचे माजी महापौर सुनील कदम, नामदेव बल्लाळ, दिनकर वाडकर, चंद्रकांत कांबळे, प्रविण पाटील आदी उपस्थित होते. 

श्री. घाटगे म्हणाले, ""दिवगंत मंडलिक व राजे विक्रमसिंह घाटगे या दोन्ही नेत्यांच्या विचारांचे पाईक होऊन कागलमधील नकारात्मक राजकारण संपवायची मला घाई आहे. मला पदाची, आमदारकी हौस नाही. कर्तृत्वाच्या ताकदीवर मी बोलत आहे. तालुक्‍यातील नकारात्मक राजकारण खड्यासारखे बाजूला करण्याची गरज आहे. एक वर्षापुर्वी जे बोललो ते करुन दाखवले आहे.'' 

महावीर पाटील यांनी स्वागत केले. आनंदराव पाटील, अशोक सातुसे, चंद्रकांत कांबळे, प्रविण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. केरबा पाटील, काकासो गंगाधरे, प्रविण पाटील, चंद्रकांत कांबळे, विकास पाटील, बाळासो डाफळे, संग्राम कांबळे, सात्तापा कांबळे, चेतन पाटील, विश्वजीत पाटील, स्वप्नील पाटील, सुनिल कुंभार, षीकेश पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. रावसाहेब पाटील यांनी आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT