Kolhapur Vidhan Sabha Election Sarkarnama
कोल्हापूर

Kolhapur Vidhan Sabha Election : भ्रष्टाचार करणाऱ्यांनी तत्त्वज्ञान शिकवू नये - आमदार प्रकाश आबिटकर

‘माजी आमदार के. पी. पाटील यांचे आयुष्यच लबाडी, विश्वासघात, कपटकारस्थान, ढोंगीपणा, भ्रष्टाचार व दुसऱ्यांना कमी लेखण्यात गेले आहे.

सरकारनामा ब्यूरो

अर्जुनवाडा : ‘माजी आमदार के. पी. पाटील यांचे आयुष्यच लबाडी, विश्वासघात, कपटकारस्थान, ढोंगीपणा, भ्रष्टाचार व दुसऱ्यांना कमी लेखण्यात गेले आहे. ते स्वत: निष्क्रीय असून विकासकामांवर न बोलता ते आमची नाहक बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयनत्न करीत आहेत.

त्यांनी आम्हाला निष्ठेचे तत्त्वज्ञान शिकवू नये’, असा टोला आमदार प्रकाश आबिटकर यांनी लगावला. तिटवे (ता. राधानगरी) येथील प्रचार सभेत ते बोलत होते. आमदार आबिटकर म्हणाले, ‘आम्ही गेल्या दहा वर्षांत केलेला विकास पाहून विरोधकांचे डोळे विस्फारून गेले आहेत.

के. पी. पाटील यांनी त्यांच्या कालावधीत केलेल्या दहा वर्षांच्या कामाचा हिशोब आम्ही मागत असताना त्याचे उत्तर द्यायचे सोडून ते बेताल आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

त्यांनी आपले सर्वच आयुष्य लबाड बोलण्यात खर्ची घातले आहे. त्यांच्या लबाडीचा अनुभव अनेकांना आला आहे. त्यामुळे जनतेला त्यांच्या लबाडीची चांगलीच माहिती आहे. निवडणुकीत जनताच त्यांचा पोलोखोल करेल.’

अरुण जाधव म्हणाले, ‘जनतेनेच आमदार आबिटकर यांच्या विजयाची पताका खांद्यावर घेतलेली आहे. त्यामुळे आता त्यांच्या विजयाचा वारू कोणी रोखू शकणार नाही. के. पी. पाटील यांनी यांच्या कार्यकाळात कोणती विकासकामे केली, याचा जाब त्यांना गावात मते मागण्यासाठी आल्यानंतर नागरिकांनी विचारावा.’

यावेळी अभिषेक डोंगळे, शामराव भावके, अशोकराव फराकटे, विश्वनाथ पाटील, विजयराव बलुगडे, अशोक वारके, सचिन वारके, मानसिंगराव पाटील, विकास घारे, नंदकुमार आबदार, उपसरपंच अमोल पाटील, रमेश घारे, सदस्य अशोक पाटील, सुनील पाटील, रणजित आमदार के. डी. पाटील, शरद किल्लेदार, सुनील कांबळे, बाबासो कांबळे, साताप्पा कांबळे, आदी उपस्थित होते.

-के. पी. पाटील यांना पोटशूळ

‘ग्रामीण भागातील हजारो गोरगरीब मुलांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी आबिटकर नॉलेज सिटीची उभारणी केली आहे. राज्यातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून ती नावारूपाला येईल. मुदाळच्या संस्थेबद्दल आम्ही एकदा सुद्धा ब्र शब्द काढलेला नाही. त्यामुळे त्यांनी वायफळ बोलू नये. ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अशी शैक्षणिक संस्था उभी न करता आल्यामुळे के. पी. यांना पोटशूळ उठला आहे’, असा टोला आबिटकर यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT