Kavtemahankal Nagarpanchayat sarkarnama
कोल्हापूर

रोहित पाटील गटाचा नगराध्यक्ष बिनविरोध; केली जेसीबीने गुलालाची उधळण...

खानापूर Khanapur नगरपंचायत Nagarpanchayat निवडणुकीत Election कै. आर. आर. पाटील Late R. R. Patil यांचा मुलगा रोहित पाटील Rohit Patil यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP पॅनेल विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र अशी लढत झाली होती.

सरकारनामा ब्युरो

कवठेमहाकाळ (जि. सांगली) : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी डॉ. उदय हजारे तर उपनगराध्यक्षपदी सुवर्णा प्रल्हाद कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जेसीबीने गुलाल उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. तसेच कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या अश्विनी पाटील यांची तर उपनगराध्यक्ष पदी बदरूदिन शिरोळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

खानापूर नगरपंचायत निवडणुकीत कै. आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेल विरोध सर्व राजकीय पक्ष एकत्र अशी लढत झाली होती. त्यामुळे या निवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागले होते. खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी डॉ. उदय हजारे तर उपनगराध्यक्षपदी सुवर्णा प्रल्हाद कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जेसीबीने गुलाल उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.

कवठेमहांकाळ नगरपरिषदची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या आज निवडी पार पडल्या आहे. रोहित पाटील यांच्या पॅनेलच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सौ. अश्विनी महेश पाटील यांची नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. तर उपनगराध्यक्ष म्हणून बदरुदिन शिरोळकर यांचीही बिनविरोध निवड झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT