minister hasan mushriff celebrate in mumbai
minister hasan mushriff celebrate in mumbai 
कोल्हापूर

सेंद्रिय गुळाची ढेप कापून मुश्रीफांचा 'हॅप्पी बर्थ डे'

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे मुंबईच्या सरकारी निवासस्थानात असलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नातवंडांच्या आग्रहास्तव सेंद्रिय गुळाची ढेप कापून वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे एरवी जनतेच्या गराड्यात असणाऱ्या श्री मुश्रीफ यांनी हा वाढदिवस नातवंडंसमवेत साजरा केला.

श्री. मुश्रीफ यांचा 24 मार्च हा जन्मदिवस पण तिथीनुसार तो रामनवमीदिवशी साजरा केला जातो. वाढदिवस आणि श्री मुश्रीफ यांची सर्वच कुटुंबियांसह राजस्थानमधील अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याला देवदर्शनासाठी भेट ही नित्यनेमाची. हा वाढदिवस मात्र त्याला अपवाद ठरला. कारण, त्यांचे निम्मे कुटुंबीय मुंबईत आणि निम्मी कागलमध्ये अशीच परिस्थिती उद्भवली. यावेळचा वाढदिवसही श्री मुश्रीफ यांनी कोरोना संसर्गाविषयी जनजागृती, खबरदारी व सावधगिरी याविषयी लढून प्रबोधन करावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार कार्यकर्त्यांनी तो साजरा केला.
 
मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र अबिद यांच्यावर आठवड्यापूर्वीच मुंबईत मेंदू आणि डोळ्याशी संबंधित शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानिमित्ताने श्री. मुश्रीफ आठवड्यावर मुंबईतच आहेत. दरम्यान नातवंडांचा बालहट्ट पूर्ण करण्यासाठी केक मिळत नसतानाही सेंद्रिय गुळाची ढेप कापून श्री मुश्रीफ यांनी अनोख्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT