mla satej patil political campaign for ruturaj patil Kolhapur Assembly Election 2024 
कोल्हापूर

Kolhapur Assembly Election 2024 : दक्षिणेतील विकासाचे ऋतूपर्व पुढे न्या - आमदार सतेज पाटील

दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार ऋतुराज पाटील व्हिजन घेऊन काम करत आहेत. विकास कामांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत दक्षिण मतदारसंघाला पुढे नेले आहे.

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार ऋतुराज पाटील व्हिजन घेऊन काम करत आहेत. विकास कामांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत दक्षिण मतदारसंघाला पुढे नेले आहे. त्यांच्या पाठीशी राहून दक्षिणेतील विकासाचे ऋतूपर्व पुढे न्या, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

फुलेवाडी येथे आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. सतेज पाटील म्हणाले, ‘श्रीपतराव बोंद्रे यांनी सहकार व राजकारणात अतुलनीय कामगिरी केली आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत आहे. बोंद्रे व त्यांच्या परिवाराचे आशीर्वाद आमदार ऋतुराज यांच्या पाठिशी राहतील, याची खात्री आहे.’

ऋतुराज यांनी युवा, ज्‍येष्ठ नागरिक, महिला यांच्यासह विविध घटकांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. कामातून त्यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला असून, त्यांना फुलेवाडी परिसरातून मताधिक्य देऊ, अशी मते उपस्थितांनी व्यक्त केली.

माजी नगरसेवक राहुल माने यांनी आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून फुलेवाडी परिसराच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कदम यांनी फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत परिसरातून आमदार पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचे सांगितले.

यावेळी सुरेश मिस्त्री, इंद्रजित बोंद्रे, अतुल बोंद्रे, सोसायटीचे अध्यक्ष बळवंत लाड, उपाध्यक्ष विलास कांबळे, अमर अपराध, संचालक शिवाजीराव माने, सदाशिव पाटील, शामराव माने, नागोजी पाटील, जयसिंग माने, तात्या खेडकर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT