Prakash Awade, Raju shetti, Dhairyashil mane  Sarkarnama
कोल्हापूर

Loksabha Election : हातकणंगलेतून माने गायब ? शेट्टी विरुद्ध आवाडे यांच्यातच फाइट

Loksabha Election fight between Shetty and Awade : ऊसदराच्या आंदोलनानिमित्त माजी खासदार शेट्टी आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यातच संघर्ष सुरू आहे.

Sachin Waghmare

राहुल गडकर

Hatkangle Loksabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुद्ध शिंदे गट अशी लढत होण्याचे संकेत असताना, ऊसदराच्या आंदोलनानिमित्त माजी खासदार शेट्टी आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यातच संघर्ष सुरू असल्याचे जाणवत आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार गायब असल्याचे फलक झळकवले होते. स्थानिक राजकारणातून हा प्रकार झाला असल्याचा आरोप खासदार धैर्यशील माने यांनी केला. असे असले तरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी मात्र खासदार माने यांनाच टीकाटिप्पणीतून गायब करून दोघांनी स्वतःला प्रकाशझोतात आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत.

गेल्या दीड महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेल्या हंगामातील साखरेचे उर्वरित ४०० रुपये देण्याच्या मागणीवरून आंदोलन सुरू आहे. कारखानदारांची नकारात्मक भूमिका असली तरी माजी खासदार राजू शेट्टी हे आपल्या मागणीवर ठाम आहेत. आंदोलनादरम्यान सातत्याने विविध टप्पे पार पडत आहेत. कारखानदारांना खर्डा भाकर चालून, मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून हे आंदोलन सुरू आहे.

एकीकडे आंदोलन एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचले असताना दोन नेत्यांमधील सुरू असलेला छुपा संघर्ष समोर येत आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखानदार सध्याच्या घडीला शांत असले तरी आमदार प्रकाश आवाडे हे सातत्याने शेट्टी यांना टार्गेट करताना दिसत आहेत. सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून खासदार धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात लढत मानली जात आहे; पण त्याचबरोबर आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे हेदेखील या मतदारसंघातून लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशी अंतर्गत तयारी सुरू असल्याचे सांगितले जाते.

आम्हीही लोकसभा निवडणुक लढवणार नाही : राहुल आवाडे

आमदार प्रकाश आवाडे यांच्या आव्हानावर बोलताना शेट्टी यांनी, ऊस उत्पादक शेतक-यांना गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रूपये दुसरा हप्ता व चालूवर्षी गळीत हंगामातील पहिली उचल ३५०० रूपये दिल्यास मी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ठिय्या आंदोलन स्थळी जाहीर केले. त्यावर बोलताना आमदार आवाडे पुत्र राहुल आवाडे यांनी शासन नियमाप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध संस्था व पाणीपुरवठा संस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. स्वाभिमानी शासन निर्णयाप्रमाणे दूध दर देत नसल्याचा आरोप यावेळी केला होता. जर स्वाभिमानी शासन नियमाप्रमाणे दूध दर देत असेल, तर आम्हीही लोकसभा निवडणुक लढवणार नाही, असे राहुल आवाडे यांनी सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT