hasan mushrif about chandrakantdada patil
hasan mushrif about chandrakantdada patil 
कोल्हापूर

चंद्रकांतदादा, आमच्या गाडीचे टायर लोखंडाचे!

सरकारनामा ब्यूरो

उत्तूर : आमच्या गाडीचे टायर लोखंडी आहेत. त्यामुळे ते बदलण्याचा प्रश्‍नच येत नाही, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला.

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी "हे सरकार गाडीचे टायर बदलतात तसे बदलेल' असे वक्तव्य कोल्हापूर येथील कार्यक्रमात केले होते. त्याला मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले.

उत्तूर (ता.आजरा) येथे नागरीकांतर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती वसंतराव धुरे होते. माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली यांनी स्वागत केले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ""गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या काळात जनतेचे प्रचंड हाल झाले. विकास कामासाठी निधी मिळाला नाही. काही जनांची पेन्शन रद्द केली. आरोग्याचे प्रश्‍न सुटले नाही. पिण्याचे पाणी मिळाले नाही. यामुळे जनतेने या सरकारला नाकारले. आता महाआघाडीची सत्ता आली आहे. यामुळे जनतेचे सर्व प्रश्‍न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. या परिसरातील आंबेओहळ प्रकल्प पुर्ण करणे, गावागावातील रस्त्यांचे डांबरीकरण करणे, पानंदी दुरुस्त करणे या विकास कामांना प्राधान्य देणार आहे.''

जनता दरबार आयोजित करणार
जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार आयोजित करणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थित यावेळी जनतेचे प्रश्‍न सोडवणे, त्यांच्या अडचणी समजावून घेणार असल्याची घोषणा मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केली.

या वेळी मारूतीराव घोरपडे, शिरीष देसाई, बी. टी. जाधव, दिपक देसाई, रामदास आजगेकर, पी. डी. भाकरे, अनिल चव्हाण, राजू चव्हाण, संभाजी तांबेकर, विजय वांगणेकर, विठ्ठल उत्तूरकर, भैरू सावंत व परिसरातील 25 गावातील नागरीक उपस्थित होते. सुधीर सावंत यांनी आभार मानले. सरपंच वैशाली आपटे व जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, साखर कारखान्याचे माजी संचालक विश्‍वनाथ करंबळी, सरपंच संघटनेचे कार्यकर्ते मारुती मोरे, राजू पोतनीस व आजरा तालुक्‍यातील विविध संस्थेच्या पदाधिकारी यानी मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT