कोल्हापूर

सांगली पालिकेच्या निवडणुकीत ओवेसींची तोफ धडाडणार!

सरकारनामा ब्यूरो

मिरज : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत "एमआयएम'च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार असुद्दीन ओवेसी यांची सांगली-मिरजेत दोन जाहीर सभा घेणार आहेत.

पक्षाच्यावतीने बसप आणि भारिपसोबत आघाडी करून 40 जागा लढवल्या जातील असेही जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी आज पत्रकारांना सांगितले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शकील पिरजादे उपस्थित होते. 

"आम्ही जातीयवादी अशी प्रतिमा रंगवली गेली आहे. आमच्यामुळे भाजपचा फायदा होतो हेही चुकीचे. जातीयवादी राजकारणास पर्याय म्हणून आम्ही आहोत. मुस्लिम किंवा दलित हेच आमचे समर्थक नसून विकासाची अपेक्षा करणारा प्रत्येक नागरीक आमचा समर्थक आहे. राष्ट्रवादीचे अनेक जण आमच्या संपर्कात असून त्यांचा जाहीर पक्षप्रवेश लवकरच होईल,``असे जिल्हाध्यक्ष तांबोळी यांनी सांगितले.

ते म्हणाले,"" पालिका स्थापनेच्या वीस वर्षांनंतरही आपण रस्ते, गटारी याच सुविधांविषयी जर बोलत असू तर ते चार टर्ममधील सत्तेत सहभागी प्रत्येकाचे अपयशच आहे. त्यांना आमचाच समर्थ पर्याय असेल. आघाडीचे चिन्हाबाबत सध्या चर्चा प्रलंबित आहे. प्रभाग क्रमांक दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, नऊ, पंधरा, सोळा, अठरा, एकोणीस व वीसमध्ये आम्ही रिंगणात असू. प्रभाक क्रमांक पाच, सहा, पंधरा व सोळा येथेल विशेष लक्ष असेल. इथे आम्ही सुशिक्षित आणि तरुणांना प्राधान्य देऊ. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्यासह आमदार वारीस पठाण, अकबरुद्दीन ओवेसी हे जाहीर सभा घेतील.'

 बैठकीला शहराध्यक्ष सैद सौदागर, इम्रान जमादार, शाहीद पीरजादे, इम्रान ढालाईत आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT