कोल्हापूर: मी सतरा पक्षांच्या जीवावर आमदार झालो नाही, असा टोला माजी आमदार पी. एन. पाटील यांनी आमदार चंद्रदीप नरके यांना लगावला.
गोकुळ मल्टीस्टेट करण्यावरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान श्री पाटील यांनी गोकुळ मल्टीस्टेट व्हावा यासाठी करवीर तालुक्यातील दुग्ध उत्पादक आणि सभासदांची बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.
श्री पाटील म्हणाले 'गोकुळ' मध्ये कोणी, किती मलई खाल्ली हे स्वतःच्या काकाला विचारावे ( गोकुळ चे विद्यमान संचालक आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष अरुण नरके) यांना हा जाब विचारावा. ४१ वर्षे ते गोकुळचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांना जास्त माहिती आहे, असा ही टोला श्री पाटील यांनी लगावला. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत लाखो शेतकरी वंचित आहेत. तरीही सभागृहात तोंड न
उघडणार्यांनी माझ्या नादाला लागू नये, असा इशारा ही पाटील यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.