Palus-Kadegaon Assembly Election 2024 vishwajeet kadam assurance of development 
कोल्हापूर

Palus-Kadegaon Assembly Election 2024 : पलूस-कडेगाव समृद्ध मतदार संघ बनवेन - आमदार विश्वजित कदम

जनतेच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी सरकारमध्ये मी राज्यमंत्री झालो. डॉ. पतंगराव कदम यांचा वारसा चालविताना त्यांचे अपुरे स्वप्न साकारण्यासाठी त्याच क्षमतेने व ताकदीने काम केले.

सरकारनामा ब्यूरो

कडेगाव : जनतेच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी सरकारमध्ये मी राज्यमंत्री झालो. डॉ. पतंगराव कदम यांचा वारसा चालविताना त्यांचे अपुरे स्वप्न साकारण्यासाठी त्याच क्षमतेने व ताकदीने काम केले. गेल्या पाच वर्षांत पलूस-कडेगाव मतदार संघात १२०० कोटींचा निधी आणला. ३५० कोटींची कामे प्रस्तावित आहेत.

या भागाचा कायापालट करायचा आहे. हा मतदार संघ राज्यातील सर्वात समृद्ध बनवायचा आहे, अशा ग्वाही माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम यांनी दिली. महाविजय संकल्प सभेत त्यांनी विकासाचा आलेख कसा उंचावत नेला, याचा आलेख मांडला.

खासदार विशाल पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, मध्य प्रदेशचे माजी आमदार कुणाल चौधरी, ‘एनएसयूआय’चे अध्यक्ष आमीर शेख, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, डॉ. जितेश कदम, दिग्विजय कदम उपस्थित होते.

विश्वजीत म्हणाले, ‘‘मतदारसंघातील सर्वसामान्यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्यावर प्रेम केले. त्यांनी दुष्काळी लोकांच्या व्यथा पाहून ताकारी, टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी पाठपुरावा केला. या योजनांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात हरितक्रांती आणली. आता या योजनांच्या लाभक्षेत्रातील गावांमधील लाभापासून वंचित असलेले उंचावरील क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठीची मंजुरी घेतली आहे. भविष्यात लवकर हा राज्यातील एक समृद्ध मतदार संघ होईल.’’

खासदार विशाल पाटील म्हणाले, ‘‘आमदार विश्वजित कदम यांच्यात जनतेच्या अपेक्षापूर्तीची क्षमता आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघाला कुटुंब मानून ते पुढे नेत आहेत. राज्यात सत्ताबद्दल होणे आवश्‍यक आहे. या बदलाच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याची क्षमता विश्वजित कदम यांच्यात आहे. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी मी विश्वजित समजून काम करावे. त्यांना राज्यभर प्रचारासाठी वेळ द्यावा.’’

कुणाल चौधरी, आमीर शेख, डॉ. जितेश कदम, दिग्विजय कदम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, उपाध्यक्ष सुनील जगदाळे, सतीश पाटील, प्रणाली पाटील यांच्यासह अनेकांनी भाषणे केली.

महापूर, कोरोनात काम

आमदार विश्वजित कदम म्हणाले, ‘‘महापूर, कोरोना काळात तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून मी भारती हॉस्पिटल व भारती विद्यापीठाच्या माध्यमातून मदतकार्य केले. अशा पद्धतीने वेळप्रसंगी माझे कर्तव्य म्हणून प्रतिसरकार बनून जनतेच्या मदतीला धावलो.’’

विश्वजीत यांचे नाव दिल्लीत गाजतय

खासदार विशाल पाटील यांनी आमदार विश्वजीत यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले, ‘‘कदम कुटुंबियांनी केवळ लाडकी बहिण नव्हे तर प्रत्येक कुटुंबाच्या विकासाचा विचार केला. पलूस-कडेगावच्या सुखःदुखात ते सदैव उभे राहिले. मी दिल्लीत माझे नाव सांगतो तेंव्हा तिथले लोक म्हणतात, विश्वजीत कदमांनी चांगला माणूस निवडून दिला आहे. आता विश्वजीत कदम यांचे हात बळकट करण्याची आणि त्यांच्या देशव्यापी नेतृत्व मोहिमेला बळ देण्याची जबाबदारी तुमची आहे.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT