आजरा : निवडणुका आल्या की आजरा तालुक्याची आठवण होते. वापरून फेकून देणाऱ्या प्रवृत्तीला या निवडणुकीत आजरेकर धोबीपछाड केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आजरा तालुका कॉन्ट्रक्टर असोसिएशनचे सचिव आरिफ दरवाजकर यांनी व्यक्त केला.
अपक्ष उमेदवार ए. वाय. पाटील यांच्या प्रचारार्थ येथील छत्रपती संभाजी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. हुसेन दरवाजकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी आजरा ग्रामीण व शहरात पदयात्रा काढली.
वंचितचे युवा तालुकाध्यक्ष संतोष मासोळे म्हणाले, ‘दलित, मुस्लिम व बहुजन समाज आता जागा झाला आहे. तो आजी-माजी आमदारांच्या कोणत्याही आमिषाला व भूलथापांना बळी पडणार नाही.
वंचितचे कार्यकर्ते ए. वाय. पाटील यांच्या सोबत आहेत.’ ए. वाय. पाटील म्हणाले, ‘आजरा तालुक्यातील जनतेने यावेळी मला साथ द्यावी. पुढील आयुष्य तालुक्याच्या सेवेसाठी देईन.’ पांडुरंग दोरुगडे यांनी स्वागतामध्ये आजी-माजी आमदारांची लबाडी आजरा तालुक्यातील जनतेने पाहिली आहे.
अशा प्रवृत्तींना घरी बसवण्याचा निर्णय ‘राधानगरी’ मतदारसंघाने घेतला असून त्याला आजरा तालुका साथ देईल, असे सांगितले. शकील मुराद, दीपक लोखंडे, इम्रान लमतुरे, हिदायत शिडवणकर, सलाउद्दीन लाडजी, सईद मुल्ला,
अरुण कांबळे, भीमराव कांबळे, विनोद कांबळे, संदीप कांबळे, नारायण कांबळे, भिकाजी कांबळे, शशिकांत कांबळे, अभिजित कांबळे, रवींद्र कांबळे, विष्णू कांबळे, राहुल शिप्पूरकर, आजरा तालुक्यातील इम्मिनभाई युवा मंच, एन ए दोस्ती दरबार ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. गणेश लोडगे यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ दीक्षांत यांनी आभार मानले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.