सोळांकूर : राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार ए. वाय. पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. क्रांती सावंत यांनी त्यांना निवडून आणण्याची ग्वाही दिली.
सोळांकूर (ता. राधानगरी) येथे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या डॉ. सावंत, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांच्यासह त्यांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले. डॉ. सावंत म्हणाल्या, ‘वंचित बहुजन पक्ष हा कर्तबगार माणसाच्या मागे उभा असतो. पाटील कर्तृत्ववान असून, मतदार संघाचा तेच विकास करू शकतात, याची आम्हाला खात्री आहे. येथील आजी-माजी आमदारांनी ‘राधानगरी’च्या जनतेला फसवण्याचे काम केले आहे. त्यांना येथील सुज्ञ जनता घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’
श्री. पाटील म्हणाले, ‘सामान्य माणूस माझ्यासोबत आहे. आता वंचित बहुजन आघाडीने विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. मला दहा हत्तींचे बळ मिळाले आहे.’ दयानंद कांबळे यांनी पाटील यांच्या रुपाने कणखर नेतृत्व मिळाल्याचे सांगितले. राधानगरीच्या जनतेने आता पेटून उठण्याची गरज असून राज्यात जे अपक्ष निवडून येणार आहेत त्यात पाटील पहिल्या क्रमांकाने कसे निवडून येतील,
यासाठी राधानगरीच्या जनतेने इतिहास घडवावा, असे आवाहन केले. यावेळी नेताजी पाटील, अमर कांबळे, रुपेश कांबळे, तानाजी कांबळे, दशरथ दीक्षांत, महेश कांबळे, कुशल कांबळे, भगवान पातले, आमजाई व्हरवडेचे माजी सरपंच प्रकाश पाटील, संतोष मेगाने, शिवानंद महाजन, तसेच भरत कुंभार उपस्थित होते.
मतदारसंघात बंडखोरीची हॅटट्रिक होणार असून, राधानगरीची जनता पाटील यांना आमदार करून इतिहास घडविणार असल्याचा विश्वास अमर कांबळे यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.