शाहूनगर : भोगावती साखर कारखान्याच्या प्रत्येक निवडणुकीत जावयासाठी दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांना विरोध करणारे के. पी. पाटील हे आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांना गोंजारत आहेत; पण भोगावतीच्या काठावरील काँग्रेसचा कार्यकर्ता हा पी. एन. यांचा निष्ठावंत आहे. तो कधीही त्यांना साथ देणार नाही, असा विश्वास भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजू कवडे यांनी व्यक्त केला. अपक्ष आमदार ए. वाय. पाटील यांच्या प्रचारार्थ कौलव (ता. राधानगरी) आयोजित सभेत ते बोलत होते.
अपक्ष उमेदवार ए. वाय. पाटील म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत दिवंगत आमदार पी. एन. पाटील, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व आमदार सतेज पाटील यांच्यासोबत प्रामाणिक राहून काम केले; पण ज्यांनी मला विधानसभेचा शब्द दिला होता. ते ‘पी. एन.’ हे अकाली निघून गेले. त्यांच्या जाण्याबरोबर त्यांचा शब्दही गेला; पण आज त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे.’ मी एकाकी पडल्याचे सांगताना ए. वाय. पाटील भावूक झाले.
बिद्रीचे माजी संचालक युवराज वारके म्हणाले, ‘गेली दहा वर्षे ‘के. पी.’ यांनी ‘ए. वाय.’ यांची फसवणूक केली. राधानगरीची जनता त्यांना घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’ आता ‘राधानगरी’चं वारं फिरलंय. त्यामुळे ए. वाय. पाटील यांचा विजय निश्चित झाला आहे, असा विश्वास विवेकानंद पाटील यांनी व्यक्त केला. चंद्रकांत पाटील-कौलवकर, रणजितसिंह पाटील-कौलवकर, सरपंच रामचंद्र कुंभार, उपसरपंच सरिता पाटील, परशुराम पाटील, आबाजी पाटील, अजित पाटील, शिवाजी पाटील, राजू नाधवडे, मनोज पाटील, अक्षय चरापले, ज्ञानदेव पाटील, सुरेश चरापले, गणेश चरापले आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.