Kolhapur Vidhan sabha Election Mahayuti Sarkarnama
कोल्हापूर

Radhanagari Vidhan Sabha Election : लोकसभेला फसविणाऱ्याला जनताच धडा शिकवेल; आमदार प्रकाश आबिटकर

‘लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा जाहीर प्रचार करण्यासाठी आवश्यक मानधन घेऊन देखील फसविणाऱ्या माजी आमदार के. पी. पाटील यांना निवडणुकीत धडा शिकवा’, असे आवाहन महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.

सरकारनामा ब्यूरो

सरवडे : ‘लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा जाहीर प्रचार करण्यासाठी आवश्यक मानधन घेऊन देखील फसविणाऱ्या माजी आमदार के. पी. पाटील यांना निवडणुकीत धडा शिकवा’, असे आवाहन महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. सरवडे येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.

आमदार आबिटकर म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी के. पी. पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात होते. त्यांच्या माध्यमातून महायुती सरकारकडून कामे करून स्वार्थ साधला. महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याच्या आणाभाका घेतल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मंडलिक यांना पाठिंबा जाहीर केला. प्रत्यक्षात निवडणुकीत छुपी यंत्रणा राबवून मंडलिक यांच्या विरोधात काम करून केसाने गळा कापला. कळस म्हणजे खासदार शाहू महाराज यांच्या भुदरगड दौऱ्यावेळी मुदाळात स्वागत कमान उभारून चक्क स्वागत केले.

हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले. स्वार्थ साधणाऱ्या के. पी. पाटील यांना राधानगरीची जनता चांगलीच ओळखून असून, निवडणुकीत त्यांना कायमचे घरी बसवेल.’ शिवराज खोराटे म्हणाले, ‘मतदारसंघाच्या इतिहासात कधी नव्हे इतका विकास आमदार प्रकाश आबिटकर यांनी केला आहे. त्यांच्यामुळे मतदारसंघाची ओळख राज्यभर पोहोचली आहे. विकासकाम करणाऱ्या या माणसाचे हात बळकट करण्यासाठी आम्ही जनता दलाच्या माध्यमातून सोबत आहोत.’

यावेळी अभिषेक ढेंगे, नंदकुमार सूर्यवंशी, शिवाजीराव चौगुले, दत्तात्रय धनगर, के. के. राजगिरे, अरुण साठे, राजू साठे, मानसिंग पाटील, कुंडलिक पाटील, डी. एस. बुजरे, सर्जेराव पाटील, आनंदा कोपर्डेकर, संभाजी आरडे, बाबूराव लाड, कपिल खोराटे, जगदीश चव्हाण, सचिन काशीद, तुकाराम कुंभार, सचिन एकशिंगे, संदीप खोराटे, पांडुरंग खोत, दिगंबर साठे आदी उपस्थित होते. राजेश मोरे यांनी आभार मानले.

आयुष्य लबाडीत गेले ‘माजी आमदार के. पी. पाटील यांचे आयुष्य विश्वासघात, लबाडीत गेले आहे. विकासकामे न करता लबाडी करून ते मते मागत आहेत. त्यांना लोक कायमचे घरात बसवतील’, असे नंदकिशोर सूर्यवंशी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT