Hasan Mushrif, Samarjeet Ghatge sarkarnama
कोल्हापूर

Kolhapur : हसन मुश्रीफांचा पराभव करूनच आमदार होणार... समरजित घाटगे

मुश्रीफ Hasan Mushrif गटातून काही प्रवेश आमच्या गटात झाले आहेत. आता दोन डोस दिलेत. आता तिसरा प्रवेश म्हणजे बुस्टर डोस Booster Dose असेल.

Umesh Bambare-Patil

कोल्हापूर : राज्यात शिंदे, फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यामुळे मला मंत्रिपद, आमदारकी मिळण्याची चर्चा आहे. पण, मी राज्यपालांच्या कोट्यातून आमदार होणार नाही, हसन मुश्रीफ यांचा पराभव करूनच आमदार होणार, असा ठाम विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी व्यक्त केला.

कागल येथील शाहू सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, जनतेच्या विविध विकास कामांसाठीच मी मुंबईला खेटे मारले. तालुक्यातील विद्यमान संजय गांधी निराधार योजना समिती बरखास्त झाली आहे. लवकरच नवीन समिती अस्तित्वात येईल.

गेल्या काही दिवसांत मुश्रीफ गटातून काही प्रवेश आमच्या गटात झाले आहेत. हे त्यांना आता दोन डोस दिले आहेत. आता तिसरा प्रवेश म्हणजे बुस्टर डोस असेल. त्योच नावही लवकरच समजेल, हे सर्व लोक आमची सत्ता आली म्हणून आलेले नाहीत.

नगरपालिकेतील भ्रष्टाचार राज आपण सर्वजण मिळून कमी करणार आहोत. आता मंत्रीमंडळाचा विस्तार होईल. काही लोक मेसेज पाठवितात की आपण मंत्रीपद, राज्यपाल कोट्यातून आमदारकी मागीतली पाहिजे. पण, मी स्पष्ट करतो. मी राज्यपालांच्या आशीर्वादाने आमदार होणार नाही. हसन मुश्रीफांना पाडूनच आमदार व्हायचे आहे. मी नव्हे तर आपण आमदार व्हायचे आहे. त्याशिवाय मी कुठे जात नाही. २०२४ मध्ये हसन मुश्रिफांना पाडून आपण सगळ्यांनी आमदार होऊन या मतदारसंघाचा कोंढाणा परत मिळवू.

जास्त निधी आणून मर्दानगी दाखवा....

कोल्हापूरातील प्रत्येक आमदाराने कागल तालुक्याला निधी दिला. पण कागल तालुक्याला आलेला निधी परत जाण्यासाठी कुणीही प्रयत्न केलेल नाहीत. मात्र, त्यांनी मुंबईला जाऊन निधी आडविण्यापेक्षा खरा पुरूषार्थ असेल तर आमच्यापेक्षा जास्त निधी आणून मर्दानगी दाखवायला हवी होती, असा टोला माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT