कोल्हापूर

संध्यादेवी कुपेकर निवडणूक लढविणार नाहीत

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या चंदगड (जि. कोल्हापूर) येथील आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कुपेकर यांनी आज मुंबईत भेट घेऊन प्रकृती अस्वास्थामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत संध्यादेवी या निवडून आल्या होत्या. तसेच 2014 सालची निवडणूकही त्यांनी जिंकली होती. पक्षाने आपल्याला संधी दिली. पक्षही माझ्या पाठीशी पूर्ण क्षमतेने उभा राहिला, याबद्दल त्यांनी पवार यांचे आभार मानले. 

मी पक्षाच्या विचारांचीच असून नेहमी पक्षाच्या सोबत राहण्याची ग्वाही देत कुपेकर यांनी या वेळी दिली. माझ्याऐवजी इतरांचा विचार करावा, अशी विनंती त्यांनी पवारांकडे केली. संध्यादेवी यांच्या या निर्णयानंतर चंदगडमधील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. तेथे राष्ट्रवादी कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT