kolhapur-satej-Patil 
कोल्हापूर

'करेक्‍ट नियोजन, डायरेक्‍ट कार्यक्रम', आमदार पाटीलांच 'ठरलंय' तरी काय ? 

जवाहरनगरात उभारलेल्या एक फलकावर "करेक्‍ट नियोजन, डायरेक्‍ट कार्यक्रम' अशा स्लोगनचा डिजिटल फलक उभारला आहे. कार्यक्रम करणे म्हणजे एखाद्याचा पराभव करणे, असा त्याचा कोल्हापुरी भाषेत अर्थ आहे.

लुमाकांत नलवडे: सरकारनामा वृत्तसेवा

कोल्हापूर : 'करेक्‍ट नियोजन, डायरेक्‍ट कार्यक्रम' अशा शब्दांत आता कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचे विश्‍लेषण डिजिटल फलकांवर दिसू लागले आहे. एवढंच नव्हे तर 'ठरलं तसं घडंल', हा आमदार सतेज पाटील यांचा स्लोगन सुद्धा प्रत्येक फलकांवर दिसत आहे. 

कळत नकळत आमदार पाटील यांची शिवसेना-भाजपशी जवळीक वाढत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी 'आमचं ठरलंय' हा तयार केलेला शिवसेनेच्या उमेदवारांसाठीचा 'स्लोगन' राज्यभर गाजला. मात्र त्यांनी कॉंग्रेस मध्येच राहण्यांच ठरवलंय. तरीही उत्साही कार्यकर्ते भाजपच्या फलकावर त्यांचे छायाचित्र झळकवत आहेत. 

कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचा निकाल राजकीय विश्‍लेषकांना सुद्धा धक्का देणारा ठरला आहे. ज्यांनी ठरलं होतं त्यांनाही पावणेतीन लाखांचे लिड अनपेक्षीत होते. त्यामुळे शहरात या निवडणुकीचे विश्‍लेषण कार्यकर्ते थेट डिजिटल फलकावर, सोशल मीडियावर एक,दोन वाक्‍यात अस्सल कोल्हापुरी शब्दांत करत आहेत. जवाहरनगरात उभारलेल्या एक फलकावर "करेक्‍ट नियोजन, डायरेक्‍ट कार्यक्रम' अशा स्लोगनचा डिजिटल फलक उभारला आहे. कार्यक्रम करणे म्हणजे एखाद्याचा पराभव करणे, असा त्याचा कोल्हापुरी भाषेत अर्थ आहे. त्यावर नुतन खासदार संजय मंडलीक यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. याच बरोबर 'किंगमेकर' म्हणून आमदार सतेज पाटील यांचे छायाचित्र आहे.  

हॉकी स्टेडियम चौकात सुद्धा नुतन खासदारांचे अभिनंदन करणारा डिजिटल फलक उभारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर भाजपच्या नेत्यांची छायाचित्रे आहेत. त्याच फलकावर कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचेही छायाचित्र आहे. विशेष म्हणजे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने हा फलक उभारला आहे. केवळ डिजिटल फलकावरच नव्हे तर सोशल मीडियावर सुद्धा ''आपलं ठरलं होतं. पण एवढं पण ठरलं नव्हत'' असे म्हणून मिळालेल्या लिडबाबत चर्चा केली जात आहे. भाजपच्या नेत्यांबरोबर आमदार पाटील यांचे छायाचित्र असले तरीही मी कॉग्रेसचाच आहे, असेही त्यांनी यापूर्वीही वारंवार स्पष्ट केले आहे. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT