satej patil supporter in nervous mood
satej patil supporter in nervous mood 
कोल्हापूर

राज्यमंत्री सतेज पाटलांचे कार्यकर्ते नाराज  

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : पाच वर्षापुर्वी कॉंग्रेसमुक्त झालेल्या या जिल्ह्यात पक्षाचे चार आमदार निवडून आणताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम असूनही आमदार सतेज पाटील यांची राज्यमंत्रीपदावर बोळवण करून त्यांच्यावर अन्यायच केल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे.

श्री. पाटील हे पहिल्यांदा 2004 मध्ये अपक्ष म्हणून करवीर विधानसभा मतदार संघातून आमदार झाले, पण त्यावेळी त्यांनी कॉंग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. मतदार संघ पुनर्ररचनेनंतर त्यांनी 2009 ची निवडणूक कोल्हापूर दक्षिणमधून कॉंग्रेसच्या तिकिटावर लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात ते गृह, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री म्हणून सहभागी झाले होते.

पाच वर्षापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकी त्यांच्यासह पक्षाचे सगळेच उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्यात एक निराशेची भावना होती, पक्षाचे अस्तित्त्वही नावापुरतेच होते. अशा परिस्थितीत यावेळी विधानसभेच्या तोंडावरच त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. ज्यावेळी हे पद घ्यायला कोण तयार नव्हते अशा परिस्थितीत त्यांनी हे आव्हान नुसते स्विकारले नाही तर आपल्या ताकदीच्या जोरावर जिल्ह्यात पक्षाचे चार आमदार निवडून आणले. या जोरावर त्यांनी पहिल्यांपासूनच मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग केले होते. त्यात त्यांना कॅबिनेट मंत्री पद आणि चांगले खातेही मिळेल अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात त्यांना राज्यमंत्री पद देऊन बोळवण करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांतही नाराजीचा सूर आहे.  
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT